संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी काढली दिंडी
◻️ रिमझिम पावसामध्ये विद्यार्थ्यानी काढलेल्या आषाढी दिंडीचे सर्वत्र कौतुक
संगमनेर LIVE | आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण असून विविध विद्यालयांबरोबर संग्राम मतिबंद व मूकबधिर विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यानी दिंडीमध्ये विठोबा रुक्मिणी संत ज्ञानेश्वर तुकाराम यांची वेशभूषा करून रिमझिम पावसामध्ये आषाढी वारी दिंडीचा आनंद घेतला.
संग्राम मूकबधिर व मतिमंद विद्यालयात मोठ्या उत्साहात आषाढी वारी साजरी केली. यावेळी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, विकास भालेराव, भाऊसाहेब नरोडे, शैला जाधव, मंगल देशमुख, मनोरमा निकम, निकिता गुंजाळ, प्रवीण थोरात, हर्षदा खैरनार आदी उपस्थित होते.
वेल्हाळे परिसरातील मैदानात या मतिमंद व बधिर विद्यार्थ्याची वारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विविध वेशभूषा करून वारकरी मोठ्या आनंदाने रिमझिम पावसामध्ये हरिनामाचा गजर करत होते.
यावेळी चांगदेव खेमनर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालयाने या विशेष विद्यार्थ्यासाठी अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी या विद्यार्थ्यासाठी अधिक चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवली आहे.
सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यामध्येही अनेक कला गुण असून त्या सर्वांना वाव देण्यासाठी या उपक्रमांची आयोजन होत असते. आजची आषाढी वारी ही विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देणारे असून निसर्ग, साधुसंत आणि त्यांनी दिलेली शिकवण ही प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
या या वारीबद्दल माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अभिनंदन केले आहे.