आमदार अमोल खताळ यांनी लुटला फुगडी खेळून भक्तीरसाचा आनंद
◻️ मनोली येथे सुरू असलेल्या हनुमान अखंड हरिनाम सप्ताहात झाले होते सहभागी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मनोली येथे सुरु असणाऱ्या हनुमान अखंड हरिनाम सप्ताहात अबाल-वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले - मुली, भजनी आणि भाविक - भक्तांबरोबर आमदार अमोल खताळ यांनी सुद्धा फुगडी खेळून भक्तीरसाचा आनंद लुटला.
तालुक्यातील मनोली येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाला आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष देविदास शिंदे यांनी आमदार खताळ यांचा सन्मान केला. आबाल-वृद्ध, पुरुष, महिला आणि बालवारकऱ्यांसमवेत आमदार अमोल खताळ यांनी देखील फुगडी खेळून भक्तीरसाचा आनंद घेतला आहे.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, आमच्या परिवाराला सुद्धा धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे. माझी आई प्रत्येक वर्षी वारी करते. वारीतून खऱ्या अर्थाने एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. तर, तशीच ऊर्जा अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून मिळत असल्याचे सांगताना त्यांनी सप्ताह सोहळ्याचे सुंदर आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक देखील केले.
दरम्यान याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.