संगमनेर येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन सोहळा उत्साहात
◻️ आमदार अमोल खताळ पालखी खांद्यांवर घेऊन शोभायात्रेत झाले सहभागी
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील माळीवाडा येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगतेनिमित्त शहराच्या विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून संत सावता महाराज यांची पालखी खांद्यावर घेऊन भाविक भक्तांबरोबर शोभा यात्रेत सहभाग घेतला.
माळीवाडा येथील हनुमान मंदिर येथून संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या पालखी व प्रतिमेच्या शोभायात्रेस प्रारंभ झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’ ‘ज्ञानेश्वर माऊली तुकारामचा जयघोष’ करत शहर दुमदुमून गेले होते. मुख्य रस्त्यावरील मेन रोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, बाजार पेठ, लाल बहादूर शास्त्री चौक, नगरपालिका मार्गे ही यात्रा माळीवाडा येथे येऊन समाप्त झाली. या शोभायात्रेत लालसाडी परिधान करून महिला तर सफेद कपडे घालून पुरुष भावीक भक्त सहभागी झाले होते.
दरम्यान या शोभायात्रेत माळीवाडा देवस्थान ट्रस्ट आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.