मांचीहिल शैक्षणिक संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
◻️ एनसीसी विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कवायती आणि संचलनाने वेधले लक्ष
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल संस्थान येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक रंगनाथ गीते यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर कोमल सावंत यांनी “ये मेरे वतन के लोगो” हे गीत सादर करत असताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.
संस्थेच्या संचालिका नीलिमा गुणे म्हणाल्या, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यानी अधिकाधिक उत्साहित होणे गरजेचे असून गुणवत्तेला व कलागुणांना महत्व देऊन विद्यार्थ्यानी स्वतःला घडवावे असे आवाहन केले.
यावेळी ज्ञानगंगा विद्यानिकेतन व यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलच्या एनसीसी विद्यार्थ्यानी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कवायती आणि संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, प्राचार्य विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, सुनील आढाव, किसन हजारे, संस्थेतील विविध विभागातील प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप जगताप यांनी केले. यानंतर विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करण्यात आले.