भगवान वराहांचे विचार आचरणात आणावे - आमदार अमोल खताळ
◻️ सकल हिंदू समाज व वराह प्रतिष्ठानच्या वतीने वराह जयंती साजरी
संगमनेर LIVE | भगवान वराह यांनी सर्वांचे रक्षण करावे त्यांचे विचार आणि आचार तरुण पिढीने आचरणात आणून मार्गक्रमन करावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर शहरातील अकोले रोडवरील बी. एम. स्वीटजवळ सकल हिंदू समाज आणि जय बजरंग वडार समाज व वराह प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वराह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार खताळ बोलत होते.
आमदार खताळ म्हणाले की, हिंदू धर्मात वराह जयंतीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ही जयंती सर्वत्र साजरी केली जात असते भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार हा भगवान वराहचा आवतार आहे. हिरण्याक्ष या राक्षसाने पृथ्वीला (भूमि देवीला) पाताळात नेले. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण करून महासागरात उडी मारली. दातांवर पृथ्वी उचलून तिला सुरक्षित स्थानी ठेवले अन हिरण्याक्षाचा वध करून धर्म व न्यायाचा विजय केला.
धर्माचे रक्षण अन अधर्माचा नाश हा विष्णूंच्या प्रत्येक अवताराचा उद्देश. असल्याचे सांगून ते म्हणाले की वराह आवतार आपल्याला शिकवतो की अन्याय, अत्याचार, अधर्म कितीही बलाढ्य असले तरी शेवटी सत्याचा व धर्माचाच विजय होतो. भारतीय पुराणांमध्ये भूमीला माता मानले आहे. वराह आवतार हा मातृभूमीच्या रक्षणाचा संदेश दिला जातो भ्रष्टाचार, अन्याय, हिंसा या रूपातील आधुनिक ‘हिरण्याक्षा’ना पराभूत करण्या साठी समाजात धर्म, सत्य, सदाचार यांचा अवलंब करणे आवश्यक. भूमातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करून पर्यावनाचे संवर्धन करणे असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
वराह जयंतीच्यानिमित्त ढोल ताशाच्या गजरात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही मिरवणूक बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशोक चौक, चावडी, मेन रोड, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक मार्गे, चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरा जवळ या मिरवणुकीची सांगता झाली.