अमृतवाहिनीत विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी काम - सौ. देशमुख
◻️अमृतवाहिनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न
संगमनेर LIVE | माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उत्कृष्ट निकाला बरोबरच सर्व विद्यार्थ्याना नोकरी मिळून देण्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग कार्यरत असून विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्याचे काम अमृतवाहिनी सातत्याने होत असल्याचे गौरवउद्गार कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी काढले असून पालक व शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्यासाठी अधिक काम करावे असे आवाहन केले.
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील स्वामी विवेकानंद हॉलमध्ये झालेल्या पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. दत्तात्रय आरोटे, प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. जे. बी. गुरव, उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
सौ. शरयूताई देशमुख म्हणाल्या की, सध्या संगणकाचे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आले आहे. बदलत्या काळात नवी आव्हाने आहेत. विद्यार्थ्याना नवनवीन कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत. इंडस्ट्री मधील गरजा लक्षात घेऊन अमृतवाहिनी मध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्याशी असलेल्या समन्वयामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पगारावर नोकरी मिळाल्या आहेत.
एक आदर्श नागरिक, घडवण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतून सातत्याने काम होत असून विद्यार्थ्याच्या करिअरसाठी पालकांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन काम केल्यास अधिक सक्षम विद्यार्थी घडतील. अमृतवाहिनी पॉलिटेक्निकने कायम आपली गुणवत्ता जपली असून पालकांनी शिक्षकांशी समन्वय ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य धुमाळ म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी पॉलिटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनेक माजी विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत असून या विद्यार्थ्यांचा संस्थेला अभिमान आहे.
यावेळी डॉ. जे. बी. गुरव यांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तर, प्रा. जी. बी. काळे यांनी उपस्थिती सह दैनंदिन कामकाजाबाबत विद्यार्थी व पालकांना माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष समन्वयक प्रा. जे. के. सातपुते, प्रा. बी. जी. कुटे, द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अश्विनी पवार व सृष्टी खताळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
