आमदार खताळ यांच्या निवेदनानंतर महसूलमंत्र्याचे तत्काळ बैठकीचे आदेश

संगमनेर Live
0
आमदार खताळ यांच्या निवेदनानंतर महसूलमंत्र्याचे तत्काळ बैठकीचे आदेश

◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या समवेत आ. खताळ यांनी महसूलमंत्र्याची घेतली भेट

◻️ संगमनेरसह परिसरातील नागरीकांच्या ‘पोकळीस्त’ नोंदीचा प्रश्न मार्गी लागणार



संगमनेर LIVE (मुंबई) | संगमनेरमधील गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर, राजापूर व अन्य भागांतील अनेक शेतकरी व गोरगरीब नागरिक गेल्या ५० ते ६० वर्षापासून एका गंभीर अडचणीला सामोरे जात होते. त्यांच्या जमिनी, घरांच्या जागा, शेतजमीन आणि राहत्या मिळकतींवर ‘पोकळीस्त’ व ‘इतर हक्कांतील कब्जेदार’ म्हणून अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या.

या नोंदींमुळे संबंधित नागरिकांना बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र, कायदेशीर व्यवहार, पाणी जोडणी, घरपट्टी, नळपट्टीसह सर्व नागरी सुविधांपासून वंचित राहावं लागत होतं. तसेच, शेतजमिनीच्या नोंदी न झाल्यामुळे काही परिवारात देखील वाद होत होते. तर काहींना तर धमक्याही दिल्या जात होत्या.

सदर अन्यायाविरोधात स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल धोंडिबा खताळ यांच्याकडे निवेदने दिली होती. याची तात्काळ दखल घेत, आमदार खताळ यांनी महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली असून संबंधित नोंदी रद्द करून मूळ ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली.

या प्रकारामुळे मूळ जमीनमालकांच्या कायदेशीर हक्कांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यावर आमदार अमोल खताळ यांनी याबाबत महसूलमंत्र्याना विस्तृत निवेदन सादर करत, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर आणि राजापूर या गावांमधील विविध गट नंबरांवरील पोकळीस्त नोंदी त्वरित रद्द करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली .

मुख्य गट क्रमांक..

 गुंजाळवाडी गट क्र. ७९, ९२

कासारा दुमाला गट क्र. ३२, ३६, ३७, ३२,३८

समनापूर - गट क्र. ५६

राजापूर - गट क्र. २८,३८,३०

मंत्री बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद..

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाकडे सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित जमिनीवरील अनधिकृत व पोकळीस्त नोंदींबाबत तातडीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बैठक बोलावली आहे. यामुळे संबंधित रहिवाशांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत कॅबिनेट बैठक संपल्यावर महसूलमंत्री यांची भेट घेऊन, या विषयावर बैठक बोलावून विषय लवकर मार्गी लावावा अशी मागणी यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे  केली.

या भेटीत मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर सर्व माहिती कागदपत्रे मागवून अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन विषय लवकर मार्गी लावणार आहे, असे आश्वासन दिले.

“मी स्वतः मागेच महसूलमंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेऊन सर्वे नं. १०६ चा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर १०४, १०५ आणि २१९ मधील नागरिकांनी देखील माझी भेट घेऊन निवेदन दिलं. त्या अनुषंगाने आज मी पुन्हा मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी तात्काळ या विषयात बैठक घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवकरच या प्रकरणावरही ठोस निर्णय अपेक्षित आहे.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !