मांचीहिल संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतनमध्ये शालेय निवडणूक संपन्न

संगमनेर Live
0
मांचीहिल संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतनमध्ये शालेय निवडणूक संपन्न 

◻️ लोकसभा व विधानसभेसाठी इयत्ता ३ री ते १२ वी च्या विद्यार्थ्यानी मतदान केले 

◻️ पंतप्रधानसह मंत्री मंडळाकडून चांगले काम करण्याची ग्वाही; विरोधी पक्षनेता कामकाजावर लक्ष ठेवणार



संगमनेर LIVE (आश्‍वी) | शालेय जीवनात मुलांना मतदान प्रक्रिया माहित व्हावी, मतदानाचे महत्त्व कळावे व लोकशाही तत्वांची रुजवणूक व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन येथे विद्यार्थी निवडणूक घेतली जाते. नुकतीच ही निवडणूक मतदान प्रक्रिया शासकीय निवडणुकीप्रमाणेचं विद्यालयात पार पडली असून विद्यार्थी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाले होते.

यामध्ये महारथी कर्ण सेना व महाप्रतापी अर्जुन सेना, वस्तीगृह मंत्री, डे स्काॅलर मंत्री अशा उमेदवारांसाठी इयत्ता ३ री ते १२ वी च्या विद्यार्थ्यानी मतदान केले. लोकसभेसाठी एकूण ९ उमेदवार व विधानसभेसाठी वर्गातून प्रत्येक पक्षाकडून ५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 

शालेय पंतप्रधान पदी ओम भाऊसाहेब धरणे, उप पंतप्रधान पदी सार्थक बापु गव्हाणे, शालेय कामकाज मंत्रीपदी आर्यन संतोष पाचारणे, आरोग्य व स्वच्छता मंत्रीपदी रितांशु चांगदेव मोटे, अर्थ व सहल मंत्रीपदी ओम राहूल गवळी, पर्यावरण व क्रीडा मंत्रीपदी सर्वेश सचिन पोमनर, सांस्कृतिक मंत्रीपदी शुभम संतोष पोमनर यांचा महारथी कर्ण सेनेकडून निवडणूकीत दणदणीत विजय झाला. होस्टेल केअर मंत्रीपदी अजिंक्य रेवननाथ बाचकर तर डेस्काॅलर केअर मंत्रीपदी साहिल रवींद्र उंबरकर यांची निवड झाली. तर विरोधी पक्षनेतेपदी आर्यन झावरे यांची निवड झाली.

मतदानाच्या वेळी सुरक्षा व शिस्तीसाठी एनसीसी विभाग प्रमुख माजी सैनिक मेजर संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किसन हजारे, अनिल जोशी व शशीकांत गमे यांनी प्रक्रिया पार पाडली.

दरम्यान अ‍ॅड. शाळीग्राम होडगर यांचे मार्गदर्शनाखाली संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, संचालक सुनिल आढाव, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, सचिव किसन हजारे, मुख्याध्यापिका योगीता दुकळे, शीतल सांबरे, सारीका खेमनर हे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. तर, ही मतदानप्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित मंत्रिमंडळाने सर्वाना सोबत घेऊन चांगले काम करण्याचे आश्वासन दिले.

लोकसभा व विधानसभा या दोन विभागांसाठी मतदान पार पडत असताना अर्ज भरणे, अर्ज माघार घेणे, उमेदवार जाहीर करणे, प्रचार करणे, आचारसंहिता, मतपत्रिका, बोटाला शाई लावणे यांचा अवलंब करत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेषतः लोकसभेसाठी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यानी मतदान केले तर, विधानसभेसाठी वर्गपातळीवर मतदान झाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !