अंभोरेच्या भुमिपुत्रांने छत्रपती संभाजीनगर येथील जलसंधारणचा कार्यभार स्विकारला
आश्वी, अंभोरे, साकूरसह तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव 
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावचे सुपुत्र असलेले कपिल कोंडाजी बिडगर यांनी नुकताच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून पदभार स्विकारला आहे.
कपिल बिडगर यांनी यापूर्वी उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून संगमनेर व अकोले येथे काम केले आहे. साकूर येथील वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक कोंडाजी बिडगर व सौ. लताबाई बिडगर यांचे ते पुत्र आहेत. 
तसेच पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. संदिप बिडगर आणि आश्वी येथिल कृषि सेवा केंद्राचे अमोल बिडगर यांचे बंधू आहेत. तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब जऱ्हाड आणि अशोक जऱ्हाड यांचे ते जावई असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशी माहिती पत्रकार रवींद्र बालोटे यांनी कळविली.
 
