अश्‍विन आयुर्वेद महाविद्यालयातील ऋषिकेश दराडे यांचे नेत्रदीपक यश

संगमनेर Live
0
अश्‍विन आयुर्वेद महाविद्यालयातील ऋषिकेश दराडे यांचे नेत्रदीपक यश  

◻️ मांची हिलच्या विद्यार्थ्याचा राष्ट्रीय पातळीवर दुहेरी गौरव

संगमनेर LIVE (आश्‍वी) | ऋषिकेश साहेबराव दराडे याने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा (नवी दिल्ली), आयआयएम (लखनऊ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रस्तरीय नवप्रवर्तन आयडिया हॅकेथॉन - प्री इन्क्यूबेशन ट्रेनिंग प्रोग्राम स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. ऋषिकेश हा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्‍विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. 

नुकत्याच राष्ट्रीय पातळीवर नवप्रवर्तन आयडिया हॅकेथॉन - प्री इन्क्यूबेशन ट्रेनिंग प्रोग्राम स्पर्धा पार पडल्या. यामध्ये आयुष इनोवेशन ॲन्ड रिसर्च प्रोग्राममध्ये ऋषिकेशने ‘नेत्र परीक्षण मशीन’ डिझाईन सादर केले. यावेळी उत्कृष्ट सक्रीय सहभागी सदस्य म्हणून ऋषिकेश दराडेच्या डिझाईनची निवड करत त्याला गौरविण्यात आले. तसेच सेन्ट्रल इंडिया हेल्थकेअर लर्नर्स फोरम (नागपूर) आयोजित आयुर सर्ज - २०२५  मध्ये ‘नेत्र परीक्षण मशीन डिझाईन’ला १५ व्या स्थानावर अवॉर्ड ऑफ एक्सेलन्स देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान या दुहेरी यशाबद्दल ऋषिकेश दराडे यांचे मांचीहिल संस्थानचे संस्थापक अ‍ॅड. शाळीग्राम होडगर, विश्‍वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजयसिंह होडगर, संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, मुख्य अधिकारी डॉ. संजीव लोखंडे, प्राचार्या श्यामल निर्मळ, जनसंपर्क अधिकारी प्रा. दत्ता शिंदे यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !