अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात ‘अॅटी रॅगिंग सप्ताहा’चे आयोजन
◻️ १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थी हितांचे विविध उपक्रम राबविले जाणार
संगमनेर LIVE (आश्वी) | विद्यापीठ अनुदान आयोग (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार संगमनेर तालुक्यातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात १२ ते १८ ऑगस्ट २०१५ या कालावधीत अॅटी रॅगिंग साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. १२) या सप्ताहाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी धन्वंतरी पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रमुख पाहुण्याचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्डे आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. ज्योती मालपाणी उपस्थित होत्या.
संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, कार्यकारी अधिकारी डॉ. संजीव लोखंडे, प्राचार्या डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. विद्या सरोदे, जनसंपर्क अधिकारी प्रा. दत्ता शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. तुषार देशपांडे, डॉ. पूजा देशपांडे, डॉ. निव्या टी. एस. डॉ. प्रियंका आढाव, डॉ. निशांत इंगळे, डॉ. जयश्री कोल्हे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. ज्योती मालपाणी यांनी अॅटी रॅगिंग कायदेविषयक विषयी विस्तृत माहिती सांगत जनजागृती केली. ‘तरुण विद्यार्थ्यानी शिक्षण घेताना संयम ठेऊन वागा’. शिक्षण घेताना निखळ मैत्री असावी त्यात कोणत्याही प्रकारे वाईट हेतू ठेऊन मैत्री करू नका. असे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्डे यांनीही उपस्थित विद्यार्थ्याना रॅगिंग कायदा व कायद्यातील तरतुदी सांगितल्या. तसेच स्वतः चांगले वागा, चांगले शिक्षण घेऊन सक्षम बना. कोणत्याही संकटाच्या प्रसंगी पोलीस सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्वाही दिली.
यावेळी अॅटी रॅगिंग ई-तक्रार गुगल फॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. सप्ताहानिमित्त अॅटी रॅगिंग थीमवरील घोषवाक्य स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर मेकिंग व लोगो, महाविद्यालय स्तरावर कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती आदि उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केले जाणार आहेत.
दरम्यान या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. सिद्धेश कानडे, रुपाली आंधळे, चैताली शिंदे, सविता भोंडे, विशाल चौधर यांच्यासह शालेय परिश्रम घेत आहेत.