रस्त्यांची कामे रद्द करण्याचा निर्णय सरकारचा; आमदार खताळ यांचा संबंध नाही!
◻️ शिवसेनेच्या विठ्ठल घोरपडे कडून कॉग्रेसच्या आरोपाला प्रतिउत्तर
संगमनेर LIVE | रस्त्यांची कामे रद्द करण्याचा निर्णय एकट्या संगमनेर तालुक्याचा नसून, जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या बाबतीत सुध्दा झाला आहे. हा निर्णय राज्य सरकारचा असून व्यक्तिगत आमदार अमोल खताळ यांचा यामध्ये संबंध नाही. त्यामुळे आमदार खताळ यांच्यावर टिका करण्याऐवजी माजी मंत्री रद्द झालेल्या कामाबाबत आपल्या भाच्याला जाब का विचारत नाही? असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) विठ्ठल घोरपडे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन संशोधन व विकास अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या रस्तांच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील कामांचीच प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय शासनाचा आहे. त्यात आमदार अमोल खताळ यांचा कुठेही संबंध नाही. राज्य सरकारने अन्य जिल्ह्याकरीता सुध्दा हीच भूमिका घेतल्याचे म्हटले.
अवघ्या आठ ते नऊ महीन्यांची आमदार खताळ यांची कारकीर्द असून त्यांना सामान्य माणसांची मिळ्णारी सहानूभूती खूप मोठी असल्याने काहींना हे देखवत नाही. त्यामुळे रद्द झालेली काम पुन्हा मंजूर करण्यासाठी आमदार खताळ हे पालकमंत्री नामदार विखे पाटील तसेच ग्रामविकस मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सरकारकडे प्रयत्न करतील. असे घोरपडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
रद्द झालेली रस्त्यांच्या कामामध्ये माझा कोणताही संबंध नाही. निर्णय का घेतला याची माहीती घ्यावी लागेल. कामा संदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा होता. प्रशासकीय स्तरावर काही त्रृटी असतील तर, त्याची चौकशी करून सुधारणा करता येईल. मात्र काहीचा स्वार्थ यामध्ये दडला असेल तर, तेही काळाच्या ओघात समोर येईल. अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.