माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मालदाड येथे जलपूजन

संगमनेर Live
0
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मालदाड येथे जलपूजन 

◻️ जलजीवन साठवण तलावात पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

संगमनेर LIVE | संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना शाश्वत पाणी मिळावे यासाठी १७१ गावे व विविध वाड्यावास्त्यांवर विकासाच्या योजना आपण राबवल्या आहेत. कारखान्याच्या सहकाऱ्यातून जलजीवन योजनेच्या माध्यमातून मालदाड मध्ये पाणी आल्याचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाने एकजुटीतून केलेली प्रगती ही इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. यावेळी त्यांनी साठवण तलावातील पाण्याचे पूजन केले.

निळवंडे डावा कालव्यातून कारखान्याच्या मदतीने मालदाड जलजीवन साठवण तलावात पाणी सोडण्यात आले. यावेळी पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच गोरख नवले, योगेश भालेराव, गोरख नवले, सौ. मंदाताई नवले, बाळासाहेब नवले, मंगेश नवले, प्रा. शिवाजी नवले, रामभाऊ नवले, कुंडलिक नवले, रामा नवले, संभाजी नवले, विजय नवले, ग्रामसेवक ज्ञानेश्वर उपरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरपंच गोरक्ष नवले यांनी उल्लेखनीय काम करून इतरांसाठी दिशा दाखवली आहे. मिया वाकी प्रकल्पातून घनदाट जंगल निर्माण केले आहे. याचबरोबर २२५०० वृक्षांचे रोपण करून यामध्ये ७२ प्रकारच्या विविध वृक्ष प्रजाती आहेत. आंबा, चिंच, सिताफळ, आवळा यांची केलेली फळबाग, आंबा नर्सरी आणि गावासाठी आणलेले पाणी यामुळे या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. येथे शेततळ्यांची संख्या जास्त असून शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये आपली शेती फुलवली आहे. जलजीवन योजनेसाठी कारखान्याच्या मदतीने निळवंडेच्या डाव्या कालव्यातून या साठवण तळ्यामध्ये पाणी सोडण्यात आले असून भविष्यामध्ये प्रत्येक घरासाठी नळाद्वारे पाणी मिळेल असे ते म्हणाले.

सरपंच गोरख नवले म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन योजना प्रगतीपथावर आहे. साठवण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. थोरात यांनी केलेल्या डाव्या कालव्यातून कारखान्याच्या मदतीने पाणी उचलले असून आज तळ्यामध्ये पाणी आले आहे. विविध रस्त्यांचा अनेक कोटी रुपये निधीतून आमच्या गावात विकासाच्या योजना त्यांनी राबवल्या आहेत. पाणी येणे आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. यातून भविष्यामध्ये प्रत्येक घरात पाणी देण्यात येणार असून पाण्याच्या काटकसरीचा वापर करत शेती फुलवण्यावर नागरिकांचा भर असणार असल्याचेही ते म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !