सिंधुताई विखे पाटील म्हणजे ‘कठीण परिश्रम व समर्पणा’चे उदाहरण

संगमनेर Live
0
सिंधुताई विखे पाटील म्हणजे ‘कठीण परिश्रम व समर्पणा’चे उदाहरण

◻️ आश्‍वी खुर्द महाविद्यालयात सिंधुताई विखे पाटील यांना अभिवादन!

संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले म्हणाले की, “सिंधुताई विखे पाटील म्हणजे एक कठीण परिश्रम व समर्पणाचे उदाहरण होते. ग्रामीण भागातील लाखो महिलांना त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरेल.” असे सांगितले 

महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे यांनी त्यांचा जीवनपट व कार्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. प्राजक्ता खळदकर यांनी विविध संस्थांचा उल्लेख करत माईनी महिलांना नवे पंख दिले, असे गौरवोद्गार काढले.

दरम्यान याप्रसंगी डॉ. सोमनाथ भूमकर व डॉ. सारिका रोहमारे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्‍विनी आहेर व प्रा. स्वप्नाली त्रिभुवन यांनी केले. तर मिनीनाथ औताडे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !