अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाला पाचव्यांदा एनबीएचे मानांकन
◻️ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांची माहिती
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट निकाल, कॅम्पस प्लेसमेंट, अत्याधुनिक सुविधा यामुळे नॅकचा ‘अ’ प्लस दर्जासह विविध गुणवत्तेचे पुरस्कार मिळवलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाला पाचव्यांदा एनबीएचे मानांकन मिळाले आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला मिळालेल्या या गुणवत्तेच्या मानांकनाबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. व्यंकटेश म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी अमृतवाहिनी हे ऑटोनॉमस कॉलेज झाले आहे. यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळवला असून नॅक चा ‘अ’ प्लस दर्जा मिळवला आहे.
महाविद्यालयातील गुणवत्ता विद्यार्थ्यासाठीच्या चांगल्या सुविधा, प्लेसमेंट, होस्टेल, अनुभवी शिक्षक, अद्यावत इमारत, क्रीडांगण, महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम या सर्वांचा आढावा घेऊन नॅशनल बोर्ड ऑफ अक्रीडेशन एनई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग आयटी इंजीनियरिंग आणि सिविल या विभागांना पाचव्यांदा एमबीएचे मानांकन दिले आहे. पदवी अभ्यासक्रम व पदवी एम टेक आणि पीएचडी संशोधन केंद्र सुद्धा या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. या मानांकरासाठी विभाग प्रमुख डॉ. आर. पी. लबडे, डॉ. बी. एल. गुंजाळ, डॉ. एस. बी कांडेकर यांच्यासह त्या विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महाविद्यालयाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपला मोठा लौकिक निर्माण केला असून १६५ एकरांवरील निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधांसह स्वच्छ व सुंदर असलेले हे महाविद्यालय गुणवत्ता विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास व संशोधनासाठी चे केंद्र बनले आहे.
दरम्यान अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला पाचव्यांदा एनबीएचे मानांकन मिळाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सौ. शरयूताई देशमुख, अनिल शिंदे, डॉ. जे. बी. गुरव, डॉ. जयश्री थोरात, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्टर प्रा. विजय वाघे, आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयातून विद्यार्थ्याना संशोधनास प्रोत्साहन..
स्वच्छ व सुंदर हिरवा परिसर, उच्च गुणवत्ता, प्लेसमेंट सुविधा निर्माण करून देताना विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयातून प्रयत्न होत असून अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यामध्ये नवनिर्मिती व संशोधनास प्रोत्साहन मिळावे याकरिता सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा
स्वच्छ व सुंदर परिसरासह होस्टेल मधून विद्यार्थ्यांना गरम पाणी, चांगले जेवण, अभ्यासासाठी वृक्षराई, क्रीडांगण, मेधा व इतर उपक्रमांचे आयोजन यामुळे पालक व विद्यार्थी यांची कायम अमृतवाहिनी संस्थेला पसंती राहिली असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी काम केले जात असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी म्हटले आहे.