स्वातंत्र्यदिना निमित्त उद्या पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने उद्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०५ वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार आहे.
दरम्यान ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सर्वानी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.