मणक्याचे आरोग्य म्हणजे जीवनाचा पाया - डॉ. स्वप्नील नवले
◻️ अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात माजी विद्यार्थी व्याख्यानमालेचे आयोजन
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात “संकल्प ते सिद्धी - माजी विद्यार्थी व्याख्यानमाला २०२५” अंतर्गत नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले डॉ. स्वप्निल नवले यांनी ‘पाठीच्या विकारांचे कारण, लक्षणे व आयुर्वेद तसेच आधुनिक चिकित्सा पद्धती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी “मणक्याचे आरोग्य म्हणजे जीवनाचा पाया असून उतार वयात जवळजवळ ९५ टक्के लोक मणके विकारामुळे विविध आरोग्य समस्येला तोंड देत असतात.” सांगताना विद्यार्थ्याना शारीरिक स्थिती, जीवनशैलीतील बदल व औषधोपचार याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ व सह अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य अधिकारी डॉ. संजीव लोखंडे होते. व्याख्यानापूर्वी संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. दक्षिण कोरियातील संशोधन प्रकल्पासाठी निवड झाल्याबद्दल डॉ. गीतांजली आहेर यांचा याप्रसंगी विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. निशांत इंगळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यापक डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. पूजा देशपांडे, डॉ. निकिता शेळके, डॉ. गीतांजली आहेर, डॉ. गीता दातीर, संघटनेचे सचिव डॉ. मतीन शेख, उपाध्यक्ष डॉ. विक्रम शेलवले, खजिनदार डॉ. जयश्री कोल्हे, शिक्षेकत्तर कर्मचारी, द्वितीय व अंतिम वर्ष बीएएमएस चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.
डॉ. स्वप्निल नवले यांनी महाविद्यालयीन माजी विद्यार्थी संघटनेस साउंड सिस्टीम भेट दिला. त्यामुळे त्यांचे सर्वानी कौतुक केले.