रक्षाबंधन हा बहिण भावाच्या निःस्वार्थ प्रेमाचा सण - बाळासाहेब थोरात
◻️ आमदार सत्यजीत तांबे यांना डॉ. जयश्री थोरात यांनी राखी बांधली
संगमनेर LIVE | रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. बहिण भावाच्या निःस्वार्थ प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत असल्याचे गौरवदगार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन केले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह विविध पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना राखी बांधली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये मोठी विविधता आहे. त्यामुळे आपण प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरे करतो. यामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि निस्वार्थी प्रेमाचा संदेश जगाला देणारा हा आदर्शवत असा सण आहे. आदर्श कुटुंब पद्धती निर्माण करणारी ही संस्कृती आहे. प्रत्येक महिलेचा सन्मान झालाच पाहिजे, मात्र, महाराष्ट्रात लाडक्या बहिणी यांच्या जीवावर राजकारण होणे अत्यंत दुर्दैवी आहे.
संगमनेर मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहत आहे. सण मोठ्या उत्साहाने साजरे करत आहे. आज सर्व धर्माच्या भगिनी इतर धर्माच्या भावांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधतात ही आदर्श परंपरा नक्कीच कौतुकास्पद आहे.
महिलांचे शिक्षण महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असून आदर्श परंपरा जपताना देशात आणि समाजात बंधुभाव वाढीस लागेल यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, युवा पिढी अनेक सण साजरी करत आहे. मात्र बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण सर्वासाठी अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचा असल्याची भावना व्यक्त केली.
एक वही बहिणीसाठी, सुदर्शन निवासस्थानी मोठी गर्दी..
युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी रक्षाबंधनानिमित्त तालुक्यातील अनेक युवकांना राख्या बांधल्या. युवक काँग्रेस सह विविध पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक यांनी सुदर्शन निवासस्थानी येऊन डॉ. जयश्री थोरात यांच्याकडून राखी बांधून घेतली. यावेळी युवकांची मोठी उपस्थिती हे या रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. युवकांनी एक वही बहिणीसाठी हा उपक्रम राबवला.