अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न
◻️ विविध महाविद्यालयांतील ३० प्राध्यापकानी कार्यशाळेत नोंदवला सहभाग
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात नुकतीच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मान्यता प्राप्त तीन दिवसीय आरोग्य विज्ञान शिक्षण तंत्रज्ञानातील मूलभूत कार्यशाळा (एचएसईटी) यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेदरम्यान शिक्षकांना आरोग्य विज्ञान शिक्षण तंत्रज्ञानातील अध्यापन, संवादकौशल्य, अध्यापन पद्धतीतील नवीन तंत्रे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन पद्धती तसेच अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील ३० प्राध्यापक सहभागी झाले होते.
या प्रशिक्षण कालावधीत नामांकित प्रशिक्षकांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉ. विनया दीक्षित, डॉ. तरन्नूम पटेल, डॉ. माया गोखले, डॉ. निलीमा धारकर, डॉ. योगेश सुरसे, डॉ. अंकुश गुंजाळ, डॉ. मनीषा वालुंज, डॉ. प्रतिभा शिंपी या तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने झाली. याप्रसंगी आयोजक समितीचे सचिव डॉ. जयश्री कोल्हे, कार्यशाळा समन्वयक डॉ. निशांत इंगळे, इव्हेंट कोऑर्डिनेटर डॉ. गीतांजली आहेर, डॉ. सिद्धेश कानडे यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
दरम्यान या कार्यशाळेसाठी संस्थेचे संचालक अण्णासाहेब बलमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीव लोखंडे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, उपप्राचार्य डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ शिवपाल खंडिझोड, डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी रंगनाथ गीते, बाळासाहेब नागरे, अशोक पर्वत, गणेश गावडे, सागर नागरे, सौ. कल्पना वाल्हेकर, राहुल पठारे यांचे विशेष सहकार्य लाभले.