गणेश मंडळे आणि ढोल ताशा पथकांचा शिवसेना महायुतीकडून सन्मान

संगमनेर Live
0
गणेश मंडळे आणि ढोल ताशा पथकांचा शिवसेना महायुतीकडून सन्मान

◻️ आमदार अमोल खताळ यांनी मंडळांच्या कार्यकर्त्याबरोबर केले नृत्य



संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील मेनरोडवर शिवसेना महायुतीच्या वतीने स्वागत कक्ष उभारून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मानाच्या गणपती मंडळे व ढोलताशा पथकावरती पुष्परष्टी करत मंडळाचा व ढोल ताशा पथक प्रमुखांचा आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

संगमनेर येथील गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत शहरातील १३ गणेश मंडळे सहभागी झाली होती. या सर्व मंडळांच्या स्वागतासाठी शिवसेना महायुतीच्यावतीने मुख्य रस्त्यावर स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळ आणि ढोल ताशा पथक प्रमुख यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

याप्रसंगी कार्यकर्त्यानी गुलालाऐवजी फुलांची पुष्प वृष्टी केली. मुख्य विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्य कर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ यांनी तरुणांच्या बरोबर विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर केले. तर तरुणांचा उत्साह पाहून त्यांनी तरुणांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.

संगमनेर शहर आणि तालुक्यात गेली दहा दिवसापासून गणेशोत्सवाची धाम धूम सुरू होती. ती शनिवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी संपली आहे. आपण येथून मागे एक गणेश भक्त म्हणून या मुख्य विसर्जन मिरवणुकीत दिवसभर थांबून सहभागी होत होतो. परंतु यावर्षी मायबाप जनतेने तालुक्याचा आमदार म्हणून निवडून दिले आणि या मिरवणुकीत तालुक्याचा लोक प्रतिनिधी म्हणून सहभागी होता आले‌ हे मी माझे भाग्य समजतो. हे गणपती बाप्पा या माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला सुखी, समाधानी ठेव आणि त्यांच्यावर कोणते ही विघ्न येऊ देऊ नको. अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ त्यांनी गणरायाला निरोप देताना केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !