सकल मराठा समाजाच्या वतीने ‘त्या..’ महिलेचा निषेध!
◻️ महिलांचा अपमान करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाईची केली मागणी
संगमनेर LIVE | सोशल मीडियाच्या माध्यमातून युटुब वर कुणाच्यातरी सांगण्यावरून कुणाचेही बद्दल अत्यंत वाईट आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे या महिलेविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून अभद्र भाषा बोलणाऱ्या या महिलेवर कठोर कारवाई करा. अशी मागणी संगमनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले असून वानखेडे हिचा तीव्र निषेध करण्यात आला.
संगमनेर पोलीस स्टेशन येथे याबाबतचे निवेदन देण्यात आले. सौ. अर्चनाताई बालोडे, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, शितल भुसाळ, अमृता राऊत, बेबीताई थोरात, सुनिता कांदळकर, मीना पटेल, सपना मंडलिक, छाया देशमुख, उज्वला गोडगे, मनीषा शिंदे, वैशाली बर्गे, सुरेश झावरे, तात्या कुटे, सत्यजीत थोरात, सुरेश थोरात, सौरभ कोल्हे आदि यावेळी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, संगीता वानखेडे ही पैसे घेऊन कुणाचेही बदनामीकारक वक्तव्य करत आहेत. तिचे बोलणे अत्यंत अभद्र आणि बेताल आहे. यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. याचबरोबर महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महिला असून महिलांबद्दल बेताल भक्त व करणाऱ्या या बाई बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत रोष निर्माण झाला आहे.
मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन करत असताना या समाजाविरुद्ध या बाईने अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजात मोठा रोष निर्माण झाला असून मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज यांनीही या बाई विरुद्ध तक्रारी केल्या आहेत. पैसे दिले की कुणाबद्दलही वाईट बोलणारी ही बाई महाराष्ट्राला कलंक असल्याची टीका तालुकाध्यक्ष अर्चनाताई बालोडे यांनी केली. तर, अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी उपस्थित सर्व महिला भगिनी व मराठा समाजाच्या नागरिकांनी केली.
दरम्यान यावेळी संगीता वानखेडेच्या निषेधच्या घोषणा देण्यात आल्या.