संगमनेर तालुक्यातील ४५ शेतपाणंद रस्त्यांना मंजुरी
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पानंद रस्ते योजना २०२५-२६’ संगमनेर तालुक्यात तब्बल ४५ शेत/पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात उत्पादित होणारा शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचविण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी तालुक्यातील शेतपानंद रस्ते व्हावे यासाठी आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यामध्ये संगमनेर तालुक्यातील १८५ रस्त्यांपैकी ४५ शेतपाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये चंदनापुरी गावांतर्गत आनंदवाडी ते ठाकरवाडी, खांडगाव येथील अरगडे वस्ती ते बालोडे वस्ती, रायतेची अरगडे वस्ती ते रायतेवाडी शिवरस्ता, लोहारे येथे कदम वस्ती ते मोठेबाबावाडी, नान्नज दुमालाची काशाई मंदिर ते चत्तर वस्ती, निमोणचा काशिनाथ मळा ते सातभाई वस्ती, कोंची गावठाण ते धनगर वस्ती, खंडेरायवाडी ते धानोबा रस्ता, शिंदोडीची खामकर वस्ती ते झाप, निमज गाव ते खंडोबामळा, बांबळेवाडी गावठाण ते रामेश्वरदरा, कणसेवाडी गावठाण ते कपालेश्वर, कर्जुले पठार गावठाण ते काटवनवाडी, गुंजाळवाडी गावठाण ते कुरणवाडी,
सांगवी गावठाण ते कौठे धांदरफळ, कौठे मलकापूर गावठाण ते चिमणटेक, वरवंडी गावठाण ते पोपळघट वस्ती, कौठे धांदरफळ गावठाण ते माळ्याचा मळा, धुपेची गिऱ्हे वस्ती ते मामेखेल रोड, झोळे, गुंजाळ मळा खांडगाव ते विरबप्पा रस्ता, पोखरी हवेलीची गुंजाळ वस्ती ते खैरे वस्ती हिवरगाव पठारची गोसावी वस्ती ते माऊली रोड, मालदाडचा घळाया ते मोरदरा, मोधळवाडीची घाणेवस्ती ते पिंपळदरा रोड, सुकेवाडीची घुलेवाडी शिव ते उगलेवाडा, मांडवे बु। चहान पट्टा ते सैंदड पाईन रस्ता, कासारेचा चौगुले क्रेशर ते कोल्हे वस्ती, निमगाव भोजापूर चौफुली ते चिकणी शिवरस्ता, जवळे कडलग ते चिखली, धांदरफळ शिव रस्ता साकुर जांबूत रोड ते काळशेत, निमगाव टेंभी, जाखुरी रोड ते पानोबा वस्ती दरेवाडीचा जानकर मळा ते मनसुक वस्ती,
कोकणगाव शाळा ते इनाम वस्ती वडगाव पान टोलनाका ते दत्त मंदिर शिव, कुंभारवाडीची ठाकरवाडी ते बिरोबा मंदिर, शिवापूरची डफाळ वस्ती ते अवचितवाडी रोड बोटाची तळपेवाडी ते हायवेपर्यंत मेंगाळवाडीची तावबा सोमनाथ वस्ती ते लक्ष्मण धावजी, कातोरे वस्ती, तिगावचा कोकणगाव रोड ते कौठे कमळेश्वर, रायतेवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग ते रायतेवाडी गावा गट नं ५७ खांबे, गावठाण ते इनाम धरती खांबे, गणेशवाडी ते गायकवाड वस्ती रायतेवाडी, दिघे-राहाणे वस्ती ते रायते शिव तसेच येलखोपवाडी असे एक किलो मीटर अंतर असणाऱ्या ४५ शेतपानंद रस्त्यांचे मजबुतीकरण आणि खडीकरण केले जाणार आहे.
संगमनेर तालुक्यातील १८५ शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी रोजगार हमी मंत्री भारत गोगावले यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ४५ शेतपाणंद रस्ते मंजूर केले आहे. उर्वरित रस्ते सुद्धा लवकरच मंजूर होणार आहे या योजनेमुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी वर्गाचा दीर्घ काळचा शेतपाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणारआहे. महायुती सरकारने ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून या मंजूर रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.