राहूल गांधीची निवडणूक आयोगावर टिका ही फक्त नौटंकी - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
राहूल गांधीची निवडणूक आयोगावर टिका ही फक्त नौटंकी - मंत्री विखे पाटील 

◻️ बालिशपणा करण्याऐवजी पक्षाची प्रतिमा सांभाळण्याचा दिला सल्ला

संगमनेर LIVE (राहाता) | निवडणूक आयोगावर टिका करण्याची राहूल गांधी यांची फक्त नौटंकी सूरू असून, हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी 
शिल्लक राहीलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी. असा सल्ला जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत, ते लोक इतक्या दिवस काय करीत होते? खा. राहूल गांधी यांनी यापुर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले. आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले ते का देत नाहीत. फक्त मुक्ताफळ उधळण्याचे काम त्यांचे सुरू असल्याची टिका करून मतदार याद्यांची काही प्रक्रीया असते उगाच काही कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून सुरू आहे. आशा प्रकारामुळेच काॅग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालल असल्याचे विखे पाटील म्हणाले.

क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या समितीने छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत तशा सूचनाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, बोगस दाखले दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आले तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देवून, कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर जेष्ठ नेते मंत्री  छगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही. बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याच लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील ही सरकारची भूमिका आहे आणि भुजबळ यांची सुध्दा तीच मागणी असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले. मराठा समाजाच्या संघटनानी छत्रपती संभाजीनगर मध्ये घेतलेल्या परीषदेच्या संदर्भात प्रतिक्रीया देताना त्यांच्यकडून काही सूचना आल्यास त्याचे स्वागत करू असे स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांच्या चलो दिल्ली घोषणेवर भाष्य करताना मंत्री विखे यांनी सांगितले की,त्यांचे दिल्लीत जाणे हे मराठा अधिवेशनाच्या निमित्ताने असावे. अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही. सरकारने घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी असल्याची भावना बोलून दाखवली.

दरम्यान अलमट्टी धरणाची उंची वाढविण्या संदर्भात कर्नाटक सरकराने परस्पर पावल उचलली तर राज्य सरकार न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल आशी भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !