संगमनेर तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी ८५ लाख रुपये निधी मंजूर - आमदार सत्यजीत तांबे
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांचे जाळे मजबूत होणार
संगमनेर LIVE | सुसंस्कृत विकसित व शांत अशी राज्यात ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. याचबरोबर नव्याने तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता मंजूर झालेल्या निधीबाबत अधिक माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की, दुष्काळी तालुका ते वैभवशाली तालुका ही ओळख लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेरची झाली आहे. संगमनेरची सर्वागीन प्रगती ही त्यांच्या नेतृत्वात झाली आहे. नेहमी गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध रस्त्यांकरता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ मध्ये ३०५४, ३०६८ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ५० ते मंगळापूर रस्ता सुधारणा करणे कामाकरता १५ लाख रुपये, नांदुरी दुमाला ते निमगाव बुद्रुक रस्ता सुधारण्या कामासाठी १५ लाख रुपये, धांदरफळ खुर्द ते डोंगरे वस्ती रस्ता सुधारणा करणे १५ लाख रुपये, जवळे कडलग रस्ता सुधारणा करणे १० लाख रुपये, धुपे येथील दिघे वस्ती रस्ता सुधारले १० लाख रुपये, तर चिखली येथील मेमाने वस्ती रस्ता सुधारणे कामे करता २० लाख रुपये असे एकूण ८५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
या निधीमधून सदर रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक समृद्ध होणार असून नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सोय होणार आहे.
हा निधी मिळून दिल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांचे मंगळापुर, चिखली, धुपे, निमगाव बुद्रुक, धांदरफळ खुर्द, वडगाव लांडगा जवळे कडलग येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
काम बोलतोय नाणं खणखणीत आहे..
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. याउलट सध्याचे सत्ताधारी काम करण्यापेक्षा निगेटिव्ह भूमिका घेत आहे. अशांत झालेले संगमनेर, दडपशाही यामुळे संगमनेर शहरातील व तालुक्यातील नागरिक अस्वस्थ असून सर्व जनता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी पुन्हा एकवटली आहे. काम बोलतोय नाणं खणखणीत आहे अशा पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत आहे.