कुकडी कालव्याच्या रूंदीकरण व मजबुतीचे काम तातडीने सुरू करा - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
कुकडी कालव्याच्या रूंदीकरण व मजबुतीचे काम तातडीने सुरू करा - मंत्री विखे पाटील 

◻️ अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची मंत्री विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून पहाणी

◻️ खा. संजय राऊत आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार 


संगमनेर LIVE (कर्जत) | कर्जत तालुक्यातील होलेवाडी चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी पाहाणी केली. या भागातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे आणि मजबुती करणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी कुकडी प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले.

कर्जत तालुक्यात होलेवाडी चिलवडी आणि नवलेवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहाणी करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेवून संवाद साधला. प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या आवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी शेजारच्या वाड्या वस्त्यांपर्यत आले. यामुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही बाब ग्रामस्थांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.

मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अहीरराव यांना तातडीने या कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासित करून त्यांनी सांगितले की, अन्य काही काम ही जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने यासंदर्भात विभागाचे अभियंता गायमुखे यांनी गांभीर्याने निर्धारीत वेळेत याबाबत प्रस्ताव तयार करावेत त्यालाही मान्यता लगेच देत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

कमी लोकसंख्येची वस्ती असली तरी अनेक वर्ष पुलाची मागणी पूर्ण झाली नाही या तक्रारीचे गांभीर्य घेवून पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम सुरू कराण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून हे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आशा सूचना जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आल्या आहेत. मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य राज्य सरकारने घेतले असून सर्व मंत्री जनतेत जावून परीस्थिती जाणून घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

संजय राऊत रोज बोलले नाही तर, संपादक म्हणून त्यांची ओळख राहाणार नाही. त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देत नाही असे सांगून मंत्री विखे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना माहूरची देवी आमची कुलदेवता आहे. अनेक वर्ष पहील्या माळेला मी तिथे जातो. आम्हाला देवी प्रसन्न होते. सदावर्तेना होत नसेल तर त्यात माझा काय दोष?

मंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांचे दुख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री वेगवेगळ्या भागात गेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टिका करतो याला आम्ही महत्व देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना रेडकार्पेट पाहाणी दौरे कोणी केले त्याचे पुढे काय झाले आणि त्या सरकारच्या काळात काय घडले यावर आम्हाला बोलता येईल. मात्र, आजच्या परीस्थितीत राजकारण आम्हाला करायचे नाही. आशा शब्दात मंत्री देसाई यांनी आमदार रोहीत पवार यांच्या समाज माध्यमावरील टिकेला उत्तर दिले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !