तब्बल सहा वर्षानंतर श्रीरामपूर - नाशिक बस सेवा पुन्हा सुरू
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE | प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत गेली ६ वर्षापासून बंद असलेली श्रीरामपूर ते नाशिक तळेगाव मार्गे ही एसटी बस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन बससेवा पुन्हा सुरु सुरू करण्यात आली आहे. या एसटी बसचे तळेगाव चौफुलीवर सौ. नीलम खताळ आणि संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
तळेगाव आणि व निमोण परिसरातील सर्वसामान्य जनतेला नाशिक जवळ येते तसेच व्यवसायिकांना व्यवसायानिमित्त विदयार्थ्याना शिक्षणासाठी तसेच आजारी रुग्णांना हॉस्पिटलसाठी नाशिकला जावे लागते. मात्र गेली सहा वर्षापासून ही बस बंद करण्यात आली होती. बसची सुविधा नसल्यामुळे नाशिकला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थ्याची गैरसोय होत होती.
ही गैरसोय टाळण्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव व निमोण परिसरातील महायुतीच्या कार्यकर्त्यानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. सर्व सामान्य जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे १४ ऑगस्ट रोजी पत्र देत मागणी केली होती.
या पत्राची जिल्हा वाहतूक नियंत्रक शाखेने दखल घेत श्रीरामपूर नाशिक तळेगाव मार्गे ही बस सेवा सुरु केली आहे. त्या बद्दल शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे व तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी पालकमंत्री विखे आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे.
यावेळी या बसचे चालक कलीम सय्यद आणि वाहक बाबासाहेब लांडे यांचाही सत्कार करण्यात आला. बाभळेश्वरचे वाहतूक नियंत्रक आरिफ शेख, श्रीरामपूर नाशिक ही तळेगाव मार्गे बस सकाळी ९ वाजता निघाली आणि साडे दहा वाजता तळेगाव चौफुलीवर आली. त्यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत या बसचे धुमधडाक्या मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील सहा वर्षापासून श्रीरामपूर - नाशिक एसटी बस सेवा बंद झालेली होती. या भागातील नागरिकांनी सातत्याने मागणी केली त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून ही बससेवा सुरू झालेली आहे. याएसटी बसचा सिन्नर वनाशिक तसेच लोणी आणि श्रीरामपूर येथे हॉस्पिटलला जाण्यासाठी विद्यार्थ्याना महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी या एसटी बसेसचा उपयोग होणार आहे. या एसटी बसचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सौ. नीलम खताळ आणि संगमनेर आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी केले.