देशात पुन्हा बुद्ध धम्माची लाट येईल - शांताराम रणशूर
◻️ शिबलापूर शिवारातील माळेवाडी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामशाखेचे उद्घाटन
संगमनेर LIVE (आश्वी) | दि बुद्धिस्ट सोसायटीच्या मिशनरी कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने देशात बुद्ध धम्माची पुन्हा लाट येईल. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारातील माळेवाडी येथे ग्रामशाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात रणशूर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अनिल मुन्तोडे होते. यावेळी संगमनेरचे तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी धम्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तालुका सरचिटणीस राजू मुन्तोडे यांनी बौद्ध पूजापाठ करून वातावरण मंगलमय केले. यानंतर शाखा फलकाचे शांताराम रणशूर यांनी अनावरण करताचं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्यामुळे आसमंत दुमदुमून गेला होता.
शांताराम रणशूर पुढे म्हणाले की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची “मी सारा भारत बुद्धमय करीन” ही घोषणा होती. हिचं घोषणा सत्यात उतरवणे हि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्याच्या जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. येणाऱ्या काळात गाव तेथे शाखा उभारून बाबासाहेबांच्या विचारला अनुसरून त्यांच्या विचारांचा जागर करणे हा कृतिशील कार्यक्रम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने आखला असल्याचे सांगताना सर्वानी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी संगमनेर तालुका प्रभारी विश्वास जमधडे, कोपरगाव तालुका प्रभारी बिपीन गायकवाड, संगमनेर शहराध्यक्ष विनय घोसाळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यानंतर अशोक गायकवाड यांनी ग्रामशाखा पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणा केली. यामध्ये अध्यक्ष सचिन मुन्तोडे, सरचिटणीस संतोष मुन्तोडे, कोषाध्यक्ष आकाश जगताप यांची निवड करण्यात आली. तसेच सागर मुन्तोडे व भाऊसाहेब मुन्तोडे यांची उपाध्यक्ष पदी, किशोर मुन्तोडे व योगेश मुन्तोडे यांची सचिव पदी, बाबासाहेब मुन्तोडे, रोहिदास मुन्तोडे, आकाश मुन्तोडे, अनिकेत मुन्तोडे, राहुल भालेराव, जगन्नाथ मुन्तोडे, माधव मुन्तोडे, राजेंद्र जगताप, शिवाजी मुन्तोडे, अभय मुन्तोडे, विनायक मुन्तोडे, आदित्य मुन्तोडे, रामराव मुन्तोडे, सुनील मुन्तोडे, शहाजी मुन्तोडे, दिपक मुन्तोडे, विजय मुन्तोडे, अक्षय मुन्तोडे, सिद्धार्थ मुन्तोडे, संजय मुन्तोडे, अण्णा मुन्तोडे, राजू मुन्तोडे यांची संघटकपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी भारती बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तथा यमनाजी मुन्तोडे, बी. एस. मुन्तोडे, अशोक मुन्तोडे, आश्वीचे शाखाप्रमुख दत्तराज मुन्तोडे, माजी प्राचार्य आनंदराव गिते, भिमा बोंद्रे, माजी पंचायत समिती सदस्य तबाजी मुन्तोडे, शिबलापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील मुन्तोडे, संयुक्त जयंती महोत्सव समिती अध्यक्ष संजय मुन्तोडे, ग्रामसेवक किशोर मांढरे, भाऊसाहेब मांढरे, सुभाष नागरे, दिलावर शेख, सचिन क्षिरसागर, शामराव पांडे आदिंसह ग्रामस्थ आणि महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
दरम्यान या सुंदर कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र मुन्तोडे यांनी केले. सूत्रसंचालन शहाजी मुन्तोडे यांनी तर, आभार राजेंद्र जगताप यांनी मानले. कार्यक्रम समाप्तीनंतर उपस्थितांसाठी गोडधोड जेवणाचा बेत देखील आयोजकांनी आखला होता.