अमृतवाहिनीत २ हजार ५०० विद्यार्थिनींचा ‘अमृत गरबा’ उत्साहात संपन्न

संगमनेर Live
0
अमृतवाहिनीत २ हजार ५०० विद्यार्थिनींचा ‘अमृत गरबा’ उत्साहात संपन्न

◻️ एकविरा फाउंडेशनच्या वतीने गरबा नाईटचे आयोजन 


संगमनेर LIVE | गुणवत्तेतून देशात लौकिक मिळवणाऱ्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अमृतरास गरबा नाईट या कार्यक्रमात सुमारे २ हजार ५०० विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.

वसंत दादा क्रीडा संकुल येथे अमृतवाहिनी शिक्षण संस्था अन्नपूर्णा मेस व एकविरा फाउंडेशनच्या वतीने अमृतरास गरबा नाईट संपन्न झाली. यावेळी एकविराच्या संस्थापक डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, अन्नपूर्णा मेसचे मधुसूदन दायमा यांच्यासह विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासाकरता अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने वसंत दादा क्रीडा संकुलात भव्य गरबा दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मेट्रो सिटीत होणाऱ्या लाईव्ह कॉन्सर्ट प्रमाणे अत्यंत अद्यावत सुविधांमध्ये झालेल्या या दांडिया महोत्सवात भव्य दिव्य व्यासपीठ, एलईडी स्क्रीन, डीजे, पारंपारिक पोषकामध्ये सहभागी झालेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय झाला.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, नवरात्र उत्सव ही महिलांच्या आनंदाचे पर्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्री उत्सवाला मोठे स्थान आहे. शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजे नवरात्री महोत्सव. संगमनेर मध्ये विविध ठिकाणी अत्यंत मोठ्या उत्साहाने नवरात्री दांडिया आयोजन होत असून अमृतवाहिनी कॉलेजच्या वतीने विद्यार्थिनी करता या सांस्कृतिक परवाचे मोठे आयोजन करण्यात आले आहे. 

सध्या अत्यंत स्पर्धेचे युग आहे. ज्ञानाव्यतिरिक्त विशेष कौशल्य तुमच्याकडे हवे आहे. याकरता सर्व विद्यार्थी आयटी किंवा इतर कोर्सचे ज्ञान घेत आहे. परंतु परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याबरोबर भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी सणपरंपरा या नव्या पिढीने जपल्या पाहिजे. सर्वानी आनंदाने दसरा दिवाळीचा आनंद घ्या आपल्या स्वतःच्या आरोग्याला जपा कुटुंबाच्या आरोग्याला जपा स्वस्थ रहा मस्त रहा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, विद्यार्थी जीवन हे आनंदाचे जीवन असते. यामध्ये स्वतःला परिपूर्ण करा. आदर्श आणि उत्तम नागरिक घडण्यासाठी विद्यार्थी देशांमध्ये विविध संस्कार स्वतःमध्ये निर्माण झाले पाहिजे. याकरता सातत्याने उपक्रमशील राहा असे त्या म्हणाल्या तर या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांनीही शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !