वडगाव लांडगा येथे चाऱ्यातून ८ गायीना विषबाधा; दोन गायी दगावल्या
◻️ सौ. नीलम खताळा यांच्याकडून लांडगे कुटुंबियांचे सांत्वन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम राधुजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गायीना चाऱ्यातून विष बाधा झाली होती. मात्र, वेळीच पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्या गायीवरती उपचार केल्यामुळे सहा गायीना वाचविण्यात यश आले. मात्र, दोन गायी दगावल्या आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सौ. नीलम खताळ यांनी लांडगे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला.
तालुक्यातील वडगाव लांडगा येथे तुकाराम राधुजी लांडगे त्यांच्या ८ गाईना चाऱ्यातून विषबाधा झाली झाली होती. वडगाव लांडगाचे स्थानिक पशुवैद्यकीय डॉ. राहुल जाधव यांनी धांदरफळ बु।। येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉ. सचिन वर्पे व डॉ. राजाराम भांगरे यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी जाऊन गायीची तपासणी केली असता आठ गायीना चाऱ्यातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले.
वेळीच उपचार मिळाल्यामुळे ६ गायीना वाचविण्यात यश आले मात्र, यामध्ये २ गाई दगावल्या आहेत. त्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रसंगी सुरेश लांडगे, तुषार वाकचौरे, श्रीकांत वाकचौरे, विक्रम लांडगे, नवनाथ लांडगे, अरुण लांडगे, धनराज मालुंजकर, गणेश लांडगे उपस्थित होते.
तुकाराम लांडगे यांच्या मालकीच्या दोन गाई दगावल्या असल्याची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांनी लांडगे यांची भेट देऊन सांत्वन केले आणि या शेतकर्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदतीच्या सूचना सौ. नीलम खताळ यांनी दिल्या आहेत.