केंद सरकारच्या वस्तू सेवा कर प्रणाली पुनर्चनेचे मंत्री विखे पाटील यांच्याकडून स्वागत
◻️ नव्या कर प्रणालीमुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार
संगमनेर LIVE (शिर्डी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने वस्तू सेवा कर प्रणालीची पुनर्चना करण्याच्या ऐतिहसिक निर्णयाचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, नव्या कर प्रणालीमुळे नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास आणि देशाची अर्थव्यवस्था आत्मनिर्भरतेन अधिक बळकट होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, स्वातंत्र दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू सेवा कर प्रणालीमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्लीतील परीषदेत घेतलेल्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करून आभार मानले.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे अर्थिक दृष्ट्या देश सक्षम होत आहे. विकसित भारताच्या सर्व निर्णय प्रक्रीयेत देशातील सामान्य माणसाचे प्रतिबिंब असावे या उद्देशाने वस्तू सेवा कर प्रणालीतील बदल महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या कर प्रणालीचा देशातील नागरीक शेतकरी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक महीला आणि युवकांना मोठा दिलासा मिळेल. कर प्रणालीतील व्यापक सुधारणामुळे नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईलच परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे लघु उद्योजक, छोट्या व्यापारी वर्गासाठी व्यवसाय प्रक्रीया अधिक सुलभ करतील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.