उमेदवारीचा निकष हा जनाधार आणि कार्यावर अवलंबून - डॉ. सुजय विखे

संगमनेर Live
0
उमेदवारीचा निकष हा जनाधार आणि कार्यावर अवलंबून - डॉ. सुजय विखे

◻️ संगमनेर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा 

◻️ एकटे पुढे जाण्यापेक्षा सर्वाना घेवून जाण्याचे केले आवाहन 



संगमनेर LIVE | विधानसभा निवडणुकीप्रमाणेचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेने केला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यत पोहचविण्याचे आवाहन करतानाच इच्छुकांची संख्या पाहाता यशासाठी एकटे पुढे जाण्यापेक्षा सर्वाना घेवून जाण्याचा सल्ला डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

संगमनेर शहरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्याचा भव्य  मेळावा पार पडला. आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला साकुर येथील दिवंगत बुवाजी खेमनार तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, “काही जण विविध कारणांनी दूर गेले असतील, पण आपण सर्वजण संगमनेरच्या अस्मितेसाठी एकत्र आहोत आणि राहू. संघटनात्मक निवडणुकीत कोणतीही व्यक्ती एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. पुढील दोन दिवसांत आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार असून सर्व उमेदवारांच्या निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत आपण सर्वानी संघर्ष केला म्हणून मोठे यश आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीला मिळाले. तालुक्यात विकास कामासाठी निधी उपलब्ध होत आहे. पण, या कामांची माहीती जनतेपर्यत पोहचविण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्याची असल्याची जाणीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्याना करून दिली.

जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीच्या कामाला ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाला सुरूवात होईल. साकूर भागासाठी उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी जलसंपदा विभाग करणार असून योजनेबाबतची माहिती साकूर भागातील शेतकऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर, विधानसभा निवडणुकीत पाण्याचे गांभीर्य लोकांनी अनेक सभामधून समोर आणले. निवडणुक झाल्यानंतर सर्व परीस्थिती बदलल्याचे चित्र तुम्ही पाहात असे म्हटले.
 
उमेदवारीचा निकष नेत्याच्या जनाधारावर आणि कार्यावर आधारित असेल, केवळ नेत्याशी जवळीक किंवा रोज भेटीगाठीवर नाही. त्यांनी उदाहरण म्हणून आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख केला आणि सांगितले की, “मी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी ओळखतही नव्हतो, पण त्यांच्या कामाच्या वृत्तीवर मला विश्वास होता. म्हणूनच मी स्वतः मुंबईत जाऊन शिंदे साहेबांकडून त्यांच्यासाठी एबी फॉर्म आणला. “आपण महायुती म्हणून लढायचे आहे. कारण आपल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य जनतेच्या अपेक्षा सर्वात महत्त्वाच्या आहेत. चिन्ह काहीही असो, पण आपल्याला महायुती म्हणून एकजुटीने लढायचे आहे.”

संघटनात्मक निवडणुकीत जो त्याग करेल त्याचा सन्मान होईल. ज्यांना यावेळी तिकीट मिळणार नाही, त्यांनीही निःस्वार्थ भावनेने संघटनेसाठी काम करावे. पुढील काळात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. आशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वानी प्रेमाने, आदराने आणि प्रामाणिकपणे काम करून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महायुतीकडे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे उभे राहिलात आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्याच पध्दतीने सर्व आगामी निवडणुकीत उमेदवार कोणी जरी असेल तरी महायुती म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !