संगमनेर तालुक्यातील १५ रस्त्यांना ४ कोटींचा निधी मंजूर - आमदार अमोल खताळ
◻️ जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर निधीमुळे ग्रामीण रस्ते होणार सुदृढ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकास आणि मजबुतीकरणासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमार्फत तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तालुक्यातील १५ ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची पावसामुळे खूप दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्ते मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी जिल्हानियोजन समितीमधून निधी मिळावा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ४४ रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १५ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
त्यामध्ये नांदुरी दुमाला ते निमगाव बुद्रुक, सांगवी ते कवठे धांदरफळ रस्ता, निमज ते गुंजाळमळा रस्ता, निळवंडे कानिफनाथ वस्ती ते वडगावपान हरिजन वस्ती रस्ता, वडगावपान हरिजन वस्ती ते जोर्वे दत्त मंदिर ते पिंपरणे रस्ता, कवठे कमळेश्वर ते कारवाडी रस्ता धांदरफळ खुर्द ते गोडसेवाडी गणेशवाडी खांडगाव रस्ता, चिंचोली गुरंव वामनवाडी बोडखे वाडी ते तळेगाव हरिजन वस्ती भागवत वाडी वामनवाडी रस्ता,
पोखरी हवेली ते घुलेवस्ती रस्ता, खराडी रस्ता, निमगाव भोजापुर जवळे कडलग रस्ता, सायाळे चोरकवठे ते घोटेवाडी रस्ता, कुंभारवाडी जोंधळेवाडी रस्ता, शिंदोडी ते ढोणेवाडी रस्ता, गिऱ्हेवाडी ते कोळ्याचीवाडी शेंगाळवाडी रस्ता अशाप्रकारे १५ रस्ते मजबुती करण आणि डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून मंजुरी मिळाली आहे. तरी याही रस्त्यांचे लवकरात लवकर कामे सुरू केले जातील असे आमदार खताळ यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेल्या रस्त्यांच्या सुधारणा तसेच विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेला हा निधीअत्यंत स्वागतार्ह आहे. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यत चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणे हे आपले प्राधान्य असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे निधी मिळविणे शक्य झाले आहे. विकासाच्या या वाटचालीत ग्रामस्थांच्या सहकार्याने आणखी कामे पुढे नेली जातील. आमचे उद्दिष्ट फक्त निधी मिळविणे नसून, दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला रस्ता देणे हे आहे. असे अमोल खताळ म्हणाले.