जीवनात यशस्वी होण्यासाठी आई, वडील, सदगुरू आणि शिवाच्या चरणी लिन व्हा!
◻️ पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांचे शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी बहुमोल मार्गदर्शन
◻️ चांगले कर्म करा, व्यसनापासून दूर राहा, नशा करायची असेल तर शिवाची करण्याचा दिला मंत्र
संगमनेर LIVE (राहाता) | संसाराचा भवसागर सांभळण्याचे काम ‘विठ्ठल’ आणि ‘देवांचा देव महादेव’करीत असतो. आपण फक्त साधना करण्याची तयारी ठेवायची असते. चांगले कर्म करा, व्यसनापासून दूर राहा. नशा करायची असेल तर शिवाची करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी आई - वडील, सदगुरू आणि शिवाच्या चरणापाशी लिन होण्याची तयारी सदैव ठेवा. असा महत्वपूर्ण उपदेश पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांनी शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी दिला.
अस्तगाव येथील भव्य आशा शिवनगरीत लाखो भाविकांशी पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांनी पौराणिक दाखले देवून माणसांकडून त्रृटीवर नेमके पणाने बोट ठेवून त्यापासून दूर होण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.
आपल्या मोबाईलची जेवढी चिंता करतो तेवढी आपण स्वताची घेत नाही. घर परीवार व्यवसाय धनदौलत वाढविण्यासाठी आपले प्रयत्न असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण संपती वाढवतांना वय वाढविण्याचा विचार करत नाही. संपती बरोबर वय वाढवायचे असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही. आयुष्यात उद्दीष्टापर्यत पोहचायचे असेल तर शिवपुराण कथा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी विस्तृतपणे सांगितले.
कोणत्याही उद्योगाची चिंता मालकाला असते. पण चिंता हे संसाराचे सामर्थ्य होवू शकत नाही. थोडे ओझ्यातून हलके व्हायला शिका काही गोष्टी परमेश्वरावर सोडा. संत नामदेव संत मुक्ताबाई यांची उदाहरण देवून त्यांच्या मुखात फक्त विठ्ठलचे नाव असायचे. विठ्ठलच सर्वकाही करून घेतो ही त्यांची धारणा होती. त्याच प्रमाणे देवांचा देव महादेव सुध्दा चांगल्या गोष्टी घडवितात. यासाठी आपल्या कडून फक्त मंत्र साधना होण्याची जरूरी असल्याचे पंडीत प्रदीप मिश्रा यांनी भाविकांना पटवून दिले.
शिवपुराण कथा कोणाचे भविष्य सांगत नाही. पुढे काय होणार याचा दावाही करीत नाही. समाजाला ज्ञान देण्याचे काम जरूर करते. जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला भोग चुकले नाहीत. आयुष्यात तुम्ही कोणाला घाबरला नाहीत तरी चालेल पण कर्माची भीती जरूर बाळगा. चांगले कर्म तुमच्याकडून घडावे आणि सर्वाचेच कल्याण होवो ही भावना तुमच्या विचारात असली पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त केली.
आयुष्यात व्यसनापासून दूर राहा असे आवाहन करून नशा करायचीच असेल तर शिवाची करा. चांगले ऐका चांगला विचार करा. आयुष्यात यश संपादन करायचे असेल आई वडील आपले सद्गगुरू आणि शिवाच्या मंदीरात लिन होण्याची तयारी सदैव ठेवा. असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित भाविकांना दिला.
कथेच्या तिसऱ्या दिवशी लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता. कथेसाठी जिल्ह्यासह राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.कथेचा चौथा दिवस महाशिवरात्रीचा दिवस असल्याचे पंडीत मिश्रा महाराजांनी जाहीर केले असून कथेचा शेवटच्या दिवशीची वेळ सकाळी आठ ते अकरा असल्याचे महाराजांनी जाहीर केले.