जिल्ह्यातील ८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना १० हजार रूपये अतिरिक्त मदत मंजूर!

संगमनेर Live
0
जिल्ह्यातील ८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना १० हजार रूपये अतिरिक्त मदत मंजूर!

◻️ पालकमंत्री विखे पाटील यांची आतापर्यत १ हजार ४७२ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती 

◻️ अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा 


संगमनेर LIVE (लोणी) | जिल्ह्यात सप्टेंबर महीन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख ५३ हजार २६५ शेतकऱ्यांना अतिरीक्त मदत म्हणून प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे ६२६ कोटी २६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारने पुन्हा मंजूर केली असून जिल्ह्यला आतापर्यत १ हजार ४७२ कोटी रुपये मंजूर झाले आहे. अशी माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नूकसान झाले. यामध्ये जिल्हयातील ६ लाख २६हजार २६५ हेक्टर क्षेत्राचे या नैसर्गिक आपतीमुळे नूकसान झाले होते.

जिल्ह्यातील ८ लाख ५३ हजार २६५ शेतकऱ्याना झालेल्या नूकसानीपोटी यापुर्वी ८६४ कोटी रूपयांची मदत जाहीर झाली होती. मदतीचा दुसरा टप्पा महायुती सरकारने जाहीर केला असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खत त्या अनुषंगाने मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील ८ लाख ५३ हजार २६५ शेतकऱ्याना अतिरीक्त मदत सरकारने जाहीर केली असून प्रति हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे या मदतीचे वितरण होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील नूकसानीचे गांभीर्य विचारात घेवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात उपलब्ध झालेली मदत पाहाता आतापर्यत एकूण १ हजार ४७२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी शासन संवेदनशीलपणे काम करीत असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यत ११ हजार ५९३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करून महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !