दिपावली हे आनंदाचे पर्व - ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
◻️ मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपावली सणांमध्ये सर्वाच्या जीवनात आनंद निर्माण होवो
संगमनेर LIVE | दीपावलीचा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व असून घरोघरी पेटवली जाणारी पंती अंधार दूर करून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करते. वर्षभर प्रत्येक जण मोठे कष्ट करत असतो दिवाळीचा काळ हा आनंदाचे पर्व असू सर्वाच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण व्हावी. अशा शुभेच्छा कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.
सुदर्शन निवासस्थानी दीपावलीनिमित्त कार्यकर्त्याना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये दीपोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या या सणात लहान थोर सर्व आनंदाने सहभागी होत असतात. दीपावली हा आनंदाचा काळ असतो. या काळामध्ये भेदभाव दुःख विसरून आनंदाने पुढे जायचे असते. वर्षभर प्रत्येक जण कष्ट करतो. अडचणीतून मार्ग काढतो. सण हे आनंद द्विगुणित करण्यासाठी असतात. वसुबारस ते भाऊबीज असा हा दीपावलीचा कालखंड असून हा मांगल्याचा कालावधी आहे.
यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा काळात सरकारने त्यांना मदत केली पाहिजे. संगमनेर तालुक्यामध्ये ही यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. याचबरोबर भंडारदरा, निळवंडे सह भोजापूर आणि आढळा धरण भरले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दिवाळी आनंदाने साजरी करावी असे ते म्हणाले. याचबरोबर पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा. आरोग्याची काळजी घ्या असे ते म्हणाले.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्था व त्यांच्या संलग्न संस्थांनी उत्पादक, शेतकरी, सभासद, कामगार, वाहतूकदार या सर्वाना दिवाळीनिमित्त चांगली मदत केली असून बाजारपेठेमध्ये सहकारातून सुमारे १५० कोटी रुपये आले आहे. यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार हे आपल्या तालुक्याची महत्त्वाची बाजू असून त्यामुळे शहरातील बाजारपेठ समृद्ध झाली असून सर्वानी दिवाळी आनंदात साजरी करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीमध्ये दीपावली सणाला मोठे महत्त्व आहे. या काळामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. कुटुंबाला एकत्र आणण्याचा आणि जीवन आनंदी करण्याचा हा पारंपारिक सण आहे. दिवाळी साजरी करताना सर्वानी आरोग्याची काळजी घ्या स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा अशा शुभेच्छा डॉ. जयश्री थोरात यांनी दिल्या.