संगमनेर नगरपरिषदेला ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत १ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
◻️ पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
संगमनेर LIVE | महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा तर्फे ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १ कोटी ५०लाख ५ हजार, ४७७ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरात पर्यावरण संवर्धन, पर्जन्यजल संचयन, सौर ऊर्जा वापर आणि जनजागृतीसाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
या निधीअंतर्गत वृक्षारोपण व गार्डन विकास (समूहित) - ७४ लाख, ४५ हजार ८०३ (विविध उद्याने, खुल्या जागा, रस्ता कडेची लागवड आणि घनदाट वनराई प्रकल्प यांचा समावेश) पर्जन्यजल संचयनासाठी परकुलेशन पिट्स २२लाख ५१ हजार, ६४१ कवी अनंत फदी नाट्यगृह येथे ऑन-ग्रिड सौर ऊर्जाप्रणाली ४२ लाख ०४, हजार ०३३ पर्यावरण विषयक माहिती शिक्षण जनजागृती मोहिम ७ लाख ५० हजार आता एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
“महायुती सरकारकडून संगमनेरच्या पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेला १ कोटी ५० लाखाचा निधी हा संगमनेरकरांसाठी मोठा दिलासा आहे. वृक्षारोपण, पर्जन्य जल संचयन आणि सौर ऊर्जा यांसारख्या उपक्रमांमुळे शहरात हरित व शाश्वत विकासाला चालना मिळेल. नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व कामे गतिमान पद्धतीने पूर्ण केली जातील.” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.