अभिषेक पुजारी यांची रणजी ट्रॉफीसाठी निवड अभिमानास्पद - डाॅ. सुस्मिता विखे
◻️ प्रवरेचा विद्यार्थी अरुणाचल प्रदेशच्या क्रिकेट संघातून खेळणार
◻️ पुनम खेमनर नंतर रणजी ट्रॉफीमध्ये निवड झालेला अभिषेक हा दुसरा खेळाडू
संगमनेर LIVE (लोणी) | पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचा माजी खेळाडू अभिषेक दत्तात्रय पुजारीची यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून २०२५ - २६ च्या रणजी हंगामासाठी अरुणाचल प्रदेश राज्याच्या क्रिकेट संघात निवड झाली असून, ही प्रवरा परिसराच्या दृष्टीने अतिशय आनंददायी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारी बाब आहे. अशी प्रतिक्रिया लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी दिली.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते. अभिषेकच्या यशामागे त्याची सातत्यपूर्ण क्रिकेटचा अनेक वर्षाचा सराव आहे. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात असतांना मागील वर्षीही त्यांने अरुणाचल प्रदेशकडून क्रिकेटमधील मानाची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केलेली आहे. तसेच तो महाविद्यालयामध्ये असतांनाच रणजी ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूंच्या यादीमध्येही त्याचे नांव आघाडीवर होते.
मागील तीन वर्षापासून तो अरुणचल प्रदेश संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. महाविद्यालयामध्ये असतांना अभिषेकने खेळाबरोबरच अभ्यासाकडेही विशेष लक्ष दिले आहे. या अगोदर महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. पुनम खेमनर नंतर रणजी ट्रॉफीमध्ये निवड झालेला अभिषेक हा दुसरा खेळाडू ठरला आहे. प्रवरा परिसर आणि संस्थेच्या दृष्टीने अतिशय गौरवास्पद बाव असल्याचे डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी सांगत मंत्री विखे पाटील यांच्या शिक्षण क्षेञातील दुरदृष्टीने प्रवरा ही आज शिक्षण क्षेत्रा बरोबरोबरचं क्रिडा क्षेत्रात ही आघाडीवर आहे.
क्रीडा प्रशिक्षक डॉ. उत्तम अनाप यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे, त्याच्या यशाबद्दल बोलतांना ते म्हणाले की, अभिषेक हा नेहमीच जिद्दीने व मेहनतीने खेळत असतो. आपण देशासाठी व परिसरासाठी काहीतरी केले पाहिजे, याच भावनेने प्रेरित होऊन तो तयारी करीत असे. तो नेहमीच नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खेळ अतिशय महत्वाचा घटक आहे, त्यामुळे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व बहुआयामी घडण्यास मदत तर होतेच परंतु संघकार्य, शिस्त आणि लवचिकताही वाढीस लागण्यास मदत होते, हीच भावना ओळखून संस्थेच्या वतीने नुकतीच प्रवरा स्पोर्टस अँकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्याकरिता खो - खो, व्हॉलवॉल, अँथैलेंटिक्स व तायक्वोंदो या खेळांचे प्रशिक्षीत क्रीडा प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे.
अभिषेकच्या या यशबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक तथा प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार आदींनी अभिनंदन केले.