युवक कॉग्रेस आणि एकवीरा फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
◻️ डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संसार उपयोगी आणि शालेय साहित्य रवाना
संगमनेर LIVE | काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किग कमिटीचे सदस्य आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुका युवक कॉग्रेस व एकविरा फाउंडेशनच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किराणा आणि वापरावयाच्या वस्तू, शालेय व इतर उपयोगी साहित्य पाठवण्यात आले.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून मदतीचे साहित्य घेऊन ट्रक रवाना झाला. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मुख्याधिकारी किशोर भांड, रामदास तांबडे, युवक काँग्रेसचे डॉ. विजय पवार, शरद पावबाके, नामदेव कहांडळ, संदीप गोपाळे, सतीश कासार, अंबादास गुंजाळ, दीपक शिंदे, रामेश्वर पानसरे, सत्यजीत थोरात, अरुण थोरात, संदीप यादव, हौशीराम खेमनर, प्रीतम बिडवे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर बिहारमध्ये कॉग्रेस वर्किग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले बाळासाहेब थोरात यांनी तातडीने येऊन मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव येथे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली. याचबरोबर तातडीने सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सह मदत करावी अशी आग्रही मागणी केली.
नुकसानग्रस्तांच्या भेटीनंतर त्यांना तातडीने मदत मिळावी याकरता अमृत उद्योग समूहाच्या वतीने मदत पाठवण्यात आली. याचबरोबर युवक कॉग्रेसच्या डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व व्यापारी यांना या नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.
या मदतीनंतर विविध नागरिक व कार्यकर्ते व्यापारी यांनी पूरग्रस्तांसाठी वापरावयाचे कपडे, चटई, अंथरून, पांघरून, गृहपयोगी साहित्य, किराणा, साखर, तूप, शेंगदाणे, तेल, पोहे, याचबरोबर गहू, बाजरी, तांदूळ हे धान्यही दिले. अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले. याचबरोबर मेडिकल साहित्यही अनेकांनी दिले आहे. हे सर्व साहित्य यशोधन कार्यालयात जमा करून यानंतर भरलेल्या ट्रक हा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील विविध गावे व जालना जिल्ह्यामधील विविध गावांमधील नुकसानग्रस्तांना पाठवण्यात आला आहे. रामदास तांबडे, विजय पवार यांच्यासोबत युवा काँग्रेसचे विविध पदाधिकारी या ठिकाणी रवाना झाले.
दरम्यान महाराष्ट्रावर संकट आल्यास संगमनेर तालुका कायम मदतीसाठी पुढे असेल अशी ग्वाही डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली.