संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आमदार अमोल खताळ

◻️ रस्त्यांच्या कामामुळे संगमनेर शहरातील विकासाला गती येणार


संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील २१ रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने विशेष रस्ता अनुदान अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. 

संगमनेर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याकरिता नगरविकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘नगरोत्थान महाभियान’ योजनेतून संगमनेर शहरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमनेर शहरासाठी दिलेल्या भरीव निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहेत.

“संगमनेरकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचा दिलासा देणारा निर्णय झाला आहे. अनेक वर्षापासून शहरातील प्रलंबित रस्त्यांची समस्या गंभीर बनली होती आणि ती इथल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मिळालेल्या या निधीमुळे संगमनेरमध्ये रस्त्यांचे दर्जेदार काम होऊन शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या प्रमुख विकासकामांसाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.” अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

खालील रस्त्यांच्या कामाला मिळाली मंजुरी..

१) नवीन नगर रोड रस्ता कॉक्रीट करणे - १ कोटी 

२) गणेश नगर परिवार किराणा पाठीमागील गल्ली नं. १.२.३ रस्ता काँक्रेट करणे - ३० लाख 

३) कुंथूनाथ सोसायटी रस्ता डांबरीकरण करणे - २७.५० लाख 

४) पद्मा नगर नगरपालिका गल्ली काँक्रेट करणे - २० लाख 

५) आशीर्वाद स्टेट बँक कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे - २५ लाख 

६) मालदाड रोड बाळेश्वर कॉलनी रस्ता काँक्रेट करणे - २० लाख 

७) शिवाजीनगर गल्ली नंबर १ व २ काँक्रेट करणे - ३५ लाख 

८) सरस्वती हॉटेल शेजारील रस्ता डांबरीकरण करणे - ३० लाख 

९) बजाज शोरूम समोरील जनतानगर कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे - ३० लाख 

१०) पोफळे मळा हनुमान मंदिर ते इंदिरानगर पटांगण पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे - २० लाख 

११) अभंग मळा बालाघरे ते गोडसे डांबरीकरण करणे - १० लाख 

१२) वकील कॉलिनी रस्ता डांबरीकरण करणे -१५ लाख 

१३) देवाचा मळा मिसाळ ते वावळ यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे - २२ लाख 

१४) आनंद ऋषी बँक, वजीर इंटरप्राईजेस जाणता राजा मार्ग पासून यशोदा बंगल्या जवळील खांबापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे - ११ लाख 

१५) आनंद ऋषी पतसंस्था ते बाफना यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीट करणे - १५ लाख 

१६) पद्मरसिक शहा विद्यामंदिर, ज्ञानेश्वर गल्ली पासून घासबाजारापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे - ११ लाख 

१७) अकोले नाका ते गवंडीपुरा मस्जिद पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे - २० लाख 

१८) पार्श्वनाथ गल्ली ते माऊली किराणा पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे - १७ लाख 

१९) घोडेकर मळा आसावा ते साई नगर हिरे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे - १५ लाख 

२०) गजानन महाराज मंदिराच्या डाव्या व उजव्या समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे - १७.५० लाख 

२१) परदेशपुरा ते धाकटे राम मंदिर उपासनी गल्ली येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे - ०९ लाख
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !