अमृत उद्योग समूहाचे १५० कोटी बाजारात आल्यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली

संगमनेर Live
0
अमृत उद्योग समूहाचे १५० कोटी बाजारात आल्यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली

◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ गजबजली


संगमनेर LIVE | अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी व समृद्ध बाजारपेठ असलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूह व तालुक्यातील संलग्न सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या पुढे उलाढाल होत असते. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अमृत उद्योग समूहाचे १५० कोटी बाजारात आल्यामुळे शहरातील बाजारपेठ फुलली आहे.

संगमनेर शहर हे जिल्हा व राज्यातील सुसंस्कृत शांत व सुरक्षित आणि विकासातून पुढे असलेले शहर आहे. गतिमान नेतृत्व, सक्षम सहकार, शैक्षणिक व सामाजिक सलोखा यामुळे संगमनेर शहर हे देश पातळीवर विकासाचे मॉडेल ठरले आहे. मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर मध्ये मोठे अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. अस्थिरता व अस्वस्थता यामुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प झाली होती. संगमनेरच्या बाजारपेठेवर बाहेरील तालुक्यांचाही मोठा विश्वास मात्र संगमनेर मधील मोर्चे, आंदोलने, बटबटीत वाटणारी फ्लेक्सबाजी आणि अस्थिर वातावरण यामुळे बाहेरच्या नागरिकांचा संगमनेरकडे येण्याचा कल कमी झाला होता. यामुळे शहरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला.

दीपावली निमित्ताने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे २६ कोटी, राजहंस दूध संघाचे ४१ कोटी यांसह तालुक्यातील विविध संलग्न सहकारी संस्था, तालुक्यातील विविध सेवा सोसायटी, दूध संस्था, शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था मिळून सुमारे १५० कोटी रुपये बाजारात आले आहे. शेतकऱ्यांना चांगले लाभांश, बोनस, रेबिटचे वाटप करण्यात आले आहे. या संस्था सह तालुक्यातील विविध संस्थांमुळे संगमनेरच्या बाजारपेठात मोठी गर्दी दिसत आहे.

शहरात मेन रोड, नवीन नगर रोड, बाजारपेठ, नाशिक रोड यामध्ये कपडे, सोने, विविध गृह उपयोगी वस्तू, मिठाई, फटाके, रोषणाईचे दिवे, खरेदी करण्यासाठी नागरिक व महिलांची मोठी गर्दी आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका हा प्रामाणिक तालुका म्हणून ओळखला जात असून त्यामुळे संगमनेरसह आजूबाजूच्या तालुक्यातूनही नागरिक विश्वासाचे ठिकाण म्हणून संगमनेर शहरात खरेदी करण्यासाठी येतात. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. शहरात विविध दुकानांसमोर प्रदर्शनीय वस्तू सह शोभेच्या वस्तू लावण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातूनही नागरिक महिला व लहान मुले मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

याउलट राज्यात काही ठिकाणी व्यापारी वर्ग अहवाल दिल असताना संगमनेर मध्ये मात्र दुकानदार आपल्या दुकानांच्या गर्दीमुळे शटर बंद करत आहेत. खरेदीसाठी नंबर लावावे लागत आहेत. सर्वत्र उत्साह, आनंद चैतन्य असल्याने संगमनेर तालुक्याची दिवाळी आनंदात आहे. विविध रस्ते रस्त्यांवर बाल गोपाळ व चिमुकल्यांची धांदल, माहेरवासिनी सासरवासीची लगबग या आनंदमय वातावरणामुळे सर्वत्र उत्साह दिसून येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !