हिंदू धर्म टिकविण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा - आमदार अमोल खताळ
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडावरती आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त अनिल महाराज देवळेकर यांची कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तनाला आमदार अमोल खताळे यांनी हजेरी लावली. त्यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, मी हिंदू आहे आणि मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे त्यामुळे मी आमदार असलो तरी हिंदुत्वासाठी कायम काम करत राहिन. पेमगिरीचा महाकाय वड आणि शहागड या परिसराचा सर्वागीण विकास करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. यावर्षी च्या नवरात्रीमध्ये अर्ध्या भागातील स्ट्रीट लाईटचा प्रश्न सुटला आहे. मात्र, पुढील वर्षीच्या नवरात्रामध्ये गडाच्या पायथ्या पासून ते टोकापर्यंत संपूर्ण स्ट्रीट लाईट केली जाईल आणि या गड परिसराचा सर्वागीण विकास केला जाईल. अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.
दरम्यान यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थं आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.