शास्ती माफीतील तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
शास्ती माफीतील तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील - आमदार अमोल खताळ

◻️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून सांगितली अडचण


संगमनेर LIVE | राज्य शासनाने मालमत्ता करावरील शास्तीमाफीसह अभययोजना’ राबविण्यास मान्यता दिली असली, तरी नगरपरिषद प्रशासनाला तिची अंमलबजावणी करताना अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२५अखेरची थकबाकी रक्कम (IWBP) वर उपलब्ध नसल्यामुळे संगमनेर नगर परिषदेपुढे शास्ती माफीचा लाभ नागरिकांना देणे अवघड बनले होते. या पार्श्वभूमीवर सकारात्मक हालचालींना आता सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत संगमनेरकरांना शास्तीमाफीचा प्रत्यक्ष फायदा मिळणार असल्याने करदात्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

संगमनेर शहरात मालमत्ता कराशी संबंधित शास्ती माफीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. शास्तीची रक्कम करदात्यांसाठी अतिरिक्त ओझे ठरत होती. ‘अभय योजना’ ही शासनाची घोषणा झाल्यापासूनच नागरिकांमध्ये आशेचे वातावरण होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीतल्या तांत्रिक अडचणींमुळे योजना प्रत्यक्षात यायची बाकी होती. 

या गंभीर प्रश्नी आमदार अमोल खताळ यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून नगरपरिषद प्रशासना समोरील अडचणी, पोर्टलवर थकबाकीची अपूर्ण नोंद आणि नागरिकांना वेळेत दिलासा न मिळाल्यास निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. या यावर उपमुख्यमंत्र्यानी पुढील १० ते १५ दिवसांमध्ये शास्तीकर माफीच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. 

त्यामुळे नागरिकाना मोठ मिळणार आहे. आगामी काळात नगरपरिषद व शासन एकत्रित पणे योजना सुरळीतपणे राबवतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार, शशांक नमन व राहुल भोईर उपस्थित होते.

या प्रकरणाची माहिती आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांना सुद्धा दिली. त्यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या बाबत लवकरच सकारात्मक मार्ग नक्कीच काढला जाईल, असे आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयात लक्ष घातले असून लवकरच शास्ती संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. संगमनेरकरांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !