‘गाऊक्टो-२०२५’ राष्ट्रीय परिसंवादात अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाचे यश
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्र शासन अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालय अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या संघटने मार्फत एनसीआयएम नवी दिल्ली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, आयुष संचालनालय मुंबई व एमसीआयएम मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी आत्मा मलिक ध्यानपीठ कोकमठाण, शिर्डी येथे आयुर्वेद युनानी: सिनर्जीस्टिक सायन्स फॉर हॉलीस्टिक हेल्थ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
या परिषदेत झालेल्या वैज्ञानिक सत्रांमध्ये महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी पहिले पारितोषिक मिळवत राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचा मान उंचावला. यामध्ये डॉ. निशांत इंगळे यांनी वैज्ञानिक पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर डॉ. तुषार देशपांडे यांनी वैज्ञानिक संशोधन पत्र (पेपर) सादरीकरणात प्रथम पारितोषिक मिळविले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा मलिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, एनसीआयएम नवी दिल्लीचे चेअरमन डॉ. नारायण जाधव, आमदार संजय कुटे, डॉ. अभय पाटकर आदि मान्यवर उपस्थित होते. या उल्लेखनीय यशामुळे संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय च्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
दरम्यान या यशाबद्दल मांचीहिल संस्थानचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, विश्वस्त डॉ. दिग्विजयसिंह होडगर, संचालिका नीलिमा गुणे, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड यांनी अभिनंदन केले आहे.