अश्विन आयुर्वेद महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामुहिक गायन!
◻️ मांचीहिल परिसरात ‘वंदे मातरम’ या गीताच्या सुमधुर सुरांनी वातावरण झाले उल्हासित
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मांची हिल संकुलातील अश्विन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयात आयुष विभाग व आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, यांचे मार्गदर्शक सूचनेवरून ‘वंदे मातरम’ या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘वंदे मातरम’ या गीताचे सामुहिक गान हा उपक्रम उत्साहात पार पडला.
समूह गायनाद्वारे वंदे मातरम या गीताच्या सुमधुर सुरांनी वातावरण उल्हासित झाले आणि प्रत्येकाच्या रोमारोमात देशभक्ती जागृत झाली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ उपस्थित होत्या.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीची भावना जागृत राहावी याकरिता बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम’ या गीताची निर्मिती केली. आज त्या गोष्टीला १५० वर्ष पूर्ण झाले तरी, त्या गीताची उर्जा आहे तशीच आहे. दैनंदिन जीवनात राष्ट्रप्रेम व सामाजिक जबादारीची भावना प्रत्यकाने जोपासली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. मोनिका पापरीकर, डॉ. गीता दातीर, डॉ. सुषमा खंडीझोड, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. शुभांगी नलावडे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जितेंद्र शिंपी यांनी केले.