तुषार जाधव यांना कृषिथॉनचा ‘प्रयोगशील कृषि विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’ प्रदान
◻️ प्रयोगशील, प्रभावी आणि शाश्वत कृषी विस्तार कार्याचा गौरव
संगमनेर LIVE (नाशिक) | आधुनिक शेतीत युवकांचा सहभाग वाढावा आणि प्रयोगशील कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा ‘कृषिथॉन २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शनात आज प्रतिष्ठेचा ‘प्रयोगशील कृषि विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार येथील तुषार विलास जाधव यांना कृषि विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार मिळाला. तुषार जाधव हे कृषी क्षेत्रात गेल्या ११ वर्षापासुन विविध पदावर कार्यरत असून ते गावातील कृषक शेतकरी गटाचे शेती सल्लागार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रयोगशील तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता, पीक व्यवस्थापन, स्मार्ट शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक बाजारपेठेतील सहभागात लक्षणीय वाढ झाली आहे. या नाविन्यपूर्ण व परिणामकारक कार्याची दखल घेऊन ‘कृषिथॉन’च्या निवड समितीने त्यांची निवड केली.
नाशिकच्या येथे झालेल्या भव्य कृषीथॉन अंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन या समारंभात हा सन्मान कळवणचे आमदार नितीन पवार आणि कृषिथॉनचे प्रमुख साहिल नेहरकर यांच्या हस्ते तुषार जाधव यांना प्रदान करण्यात आला.
दरम्यान कृषि तज्ज्ञांनी हा सन्मान तुषार जाधव यांच्या प्रयोगशील, प्रभावी आणि शाश्वत कृषी विस्तार कार्याची ठोस पावती असल्याचे सांगितले.