शिक्षणांसोबत खेळाला देखील प्राधान्य द्या - डाॅ. सुष्मिता विखे

संगमनेर Live
0
शिक्षणांसोबत खेळाला देखील प्राधान्य द्या - डाॅ. सुष्मिता विखे

◻️ प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न


संगमनेर LIVE (लोणी) | विद्यार्थ्यानी शिक्षणासोबतच खेळायला ही महत्त्व देण्याची गरज आहे. खेळाच्या माध्यमातून आपला शारीरिक व्यायाम त्याचबरोबर संघ भावना वाढीस लागते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रवरा स्पोटर्स अकॅडमीचाही लाभ विद्यार्थ्यानी घ्यावा आणि प्रवरेतून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. असे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे यांनी केले.

प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलचा ६० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ. विखे बोलत होत्या. क्रीडा महोत्सव दि. १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला गेला. क्रीडा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चारही सदनाच्या विद्यार्थ्यानी दिमाखात संचलन करून क्रीडाध्वजास मानवंदना दिली. 

डॉ. सुष्मिता विखे यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व व्यायामाचे महत्व विशद केले. 

या क्रीडा महोत्सवात १००, २००, ४००, ८०० मीटरच्या धावण्याच्या शर्यती, तसेच लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, थाळीफेक, गोळा फेक, भालाफेक, अडथळ्याच्या शर्यती, प्राथमिक विभागाचे मनोरंजनात्मक खेळ, तसेच पालकांसाठीही अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत नेताजी सदनाने प्रथम क्रमांक मिळवून वार्षिक क्रीडा करंडकावर आपले नाव कोरले. द्वितीय सरदार पटेल सदन, तृतीय तानाजी सदन तर शिवाजी सदन चतुर्थ स्थानी राहिले. या क्रीडा महोत्सवात मुले आणि मुली असे स्वतंत्र सामने घेण्यात आले. यात मुले गटात युवराज आहेर, वैभव कवटेकर, ओमराज घाडगे, महेंद्र पाडवी तर मुलींच्या गटात कु. भोये तेजस्विनी आणि कु. अडसूळ सृष्टी यांनी वैयक्तिक  बक्षिसे पटकावली. 

अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा बेस्ट स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार हर्षल पाडवी तर बेस्ट स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कु उन्नती वर्पे यांना देण्यात आला. शिस्तबद्ध संचलनाचा पुरस्कार नेताजी सदनास मिळाला. 

डाॅ. सुष्मिता विखे यांच्या शुभहस्ते सर्व खेळाडूंना पदके व करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य  के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम. एस. जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी इत्यादी उपस्थित होते. वार्षिक क्रीडा महोत्सव नियोजनात क्रीडा संचालक रमेश दळे, डी. के. जाधव व सर्व क्रीडा शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन सौ. सिमा क्षिरसागर व संतोष ढगे यांनी केले. आभार रमेश दळे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !