अमृतवाहिनीला 'उत्कृष्ट महाविद्यालय (ग्रामीण) पुरस्कार २०२५'
◻️ पुणे येथील कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण
संगमनेर LIVE | अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र - गोवा विभागातील 'उत्कृष्ठ महाविद्यालय (ग्रामीण) २०२५' हा प्रतिष्ठित पुरस्कार पुणे येथील के. जे. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार आयएसटीई नवी दिल्ली अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, डॉ. पराग काळकर, उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या हस्ते येथे प्रदान करण्यात आला. महाविद्यालयातर्फे डॉ. प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्टर प्रा. वि. पी. वाघे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ. बी. एस. बोरकर, संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर आणि आयएसटीई समन्वयक डॉ. एम. ए. वाकचौरे यांनी स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर डॉ. हर्षदा जाधव, डॉ. डी. व्ही. जाधव, डॉ. आर. के. जैन, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. रणजीत सावंत, डॉ. के. पी. कुंभार, डॉ. सुईल भिरूड हे उपस्थित होते.
महाराष्ट्र गोवा विभागातील एकमेव महाविद्यालय म्हणून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्कार पात्र ठरले आहे. महाविद्यालयाची स्वायत्तता, पायाभूत सुविधा, पीएचडी धारक प्राध्यापक, न्याक आणि एनबीएचे वेळोवेळी मूल्यांकन, संशोधन गुणवत्ता आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम या निकषावर महाविद्यालयाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्याच्या अभ्यास, संशोधन आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकास क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्रयत्नांची प्रशंशा करण्यात येत आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश म्हणाले, “सन १९८३ यावर्षी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्ठि विचारांनी सुरु केलेले अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय नवनवीन मानांकने मिळवत आहे, विद्यार्थ्याना ज्ञान, कौशल्य देण्यात महाविद्यालय सक्षम असून आम्ही सर्वतोपरी तयार आहोत. अमृतवाहिनी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी जगभरात आपापल्या क्षेत्रांत उच्चपदांवर यशस्वीपणे काम करत आहेत. आज या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराबद्दल आम्हास विशेष आनंद होत आहे."
या पुरस्काराबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे. बी. गुरव यांनी अभिनंदन केले आहे.