शिवसेनेच्या शहर प्रमुख सौ. सविताताई वाडिले यांचे प्रकाश चित्तेवर आरोप
◻️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याची दिली माहिती
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | भाजपातुन हकालपट्टी झाल्यावर शिंदे शिवसेनेत गेलेल्या प्रकाश चित्तेनी एनवेळेस माझी उमेदवारी रद्द करून ज्याचा सेनेशी कधीही संबंध आला नाही अशा व्यक्तीला माझी उमेदवारी देऊन माझ्यावर अन्याय केलेला आहे. असा गंभीर आरोप शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ. सविताताई किशोर वाडिले यांना केला आहे.
तर, या झालेल्या अन्यायाबाबत मी उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे लवकरच लेखी स्वरूपात पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हंटले आहे.
आपल्या तक्रारीत सौ. वाडिले यांनी पुढे म्हंटले आहे की, शिंदे शिवसेनेच्या स्थापनेपासून मी व माझ्या पतीने सेना वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. शिंदे शिवसेना अडचणीत असतांना पक्षासमोर येणाऱ्या प्रत्येक समस्यांना आम्ही तोंड देत त्या सोडवलेल्या आहेत.
नगरपालिका निवडणूक उमेदवारी बाबत झालेल्या मुलाखती दरम्यान माझ्या प्रभाग क्रमांक चार मधून फक्त माझीच मुलाखत झालेली होती. त्यावेळी त्या प्रभागातून ईतर कोणीही मुलाखत द्यायला पुढे आलेले नव्हते. त्यांनतर वरिष्ठानी माझ्या उमेदवारीला अनुकूलता दर्शवली होती व तयारी करण्यासही सांगितले होते.
त्यानुसार मी सर्व प्रकारचे ना हरकत दाखले मिळवले होते. माझी हक्काची उमेदवारी मला द्यायची टाळून दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीला माझी उमेदवारी प्रकाश चित्तेनी दिल्याने माझ्या प्रभागातील मतदारांमध्ये व शहरातील माझ्या समाज बांधवामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे.
दरम्यान माझ्या प्रमाणेच प्रभाग क्रमांक सात, बारा व पंधरा या प्रभागतही असाच उमेदवारी वाटपाचा घोळ प्रकाश चित्तेनी केल्याचा आरोप तक्रारीत सौ. वाडिले यांनी केला आहे.