‘व्हिजन संगमनेर २.०’ अंतर्गत शहरातील विस्कटलेली घडी सुरळीत करणार - आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर Live
0
‘व्हिजन संगमनेर २.०’ अंतर्गत शहरातील विस्कटलेली घडी सुरळीत करणार - आमदार सत्यजीत तांबे

◻️ ​उच्चशिक्षित, अनुभवी आणि कार्यक्षम उमेदवारांना 'सिंह' चिन्हावर संधी

◻️ लोकनेते बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती शहराच्या च्या विकासासाठी कटिबद्ध

​संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराने विकासातून मोठे वैभव प्राप्त केले आहे. शहरात अनेक पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत. आता, 'व्हिजन संगमनेर २.०' अंतर्गत शहरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जनतेच्या मनातील उमेदवार दिले असून, विस्कटलेली घडी सुरळीत करून नवी 'टीम संगमनेर' शहरातील सेवेसाठी कायम कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

​जनता नगर येथील जिजामाता गार्डन येथे 'संगमनेर सेवा समिती'च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांचा कार्यपरिचय करून दिला.

​विकासाची मोठी परंपरा आणि शहराचे वैभव..

​आमदार तांबे पुढे म्हणाले की, संगमनेर शहराला विकासाची मोठी आणि सातत्यपूर्ण परंपरा लाभली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात सातत्याने विकासाच्या योजना राबविण्यात आल्या. निळवंडे थेट पाईपलाईन योजनेमुळे शहराला विना लाईट, मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळत आहे. संगमनेर हे विविध समाजाचे लोक अत्यंत बंधुभावाने एका कुटुंबाप्रमाणे नांदत असलेले शहर आहे.

​शहरातील विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये..

​विकासातून वैभवशाली ठरलेल्या इमारती. ​सुसंस्कृत आणि शांततामय वातावरण. ​विश्वासाची बाजारपेठ आणि मेडीकल हब आणि ​सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेली ३५ गार्डन्स हे शहरातील विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले.

​'असुरक्षित' वातावरणाविरोधात लढणार..

​मागील चार वर्षात प्रशासक राजवट आणि गेल्या वर्षभरात शहरात निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणावर आमदार तांबे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मागील एक वर्षापासून संगमनेर शहरात अत्यंत असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. गुंडागर्दी, दहशत वाढली आहे. अमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. संगमनेरचा बंधुभाव राजकारणासाठी काही लोक जाणीवपूर्वक मोडू पाहत आहेत. तरुणांना भडकवले जात आहे आणि बाजारपेठ अस्थिर झाली आहे. महिला असुरक्षित आहेत. हे सर्व बदलायचे असून, संगमनेर शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जनसेवक म्हणून काम करणे हे नगरसेवकांचे काम असणार आहे."

​'संगमनेर सेवा समिती'ची नवी टीम..

​'संगमनेर सेवा समिती' ही राजकारण विरहित असून, शहरातील सर्व समाज घटक, संघटना आणि विविध राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन ही टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये उच्चशिक्षित, अनुभवी, कार्यक्षम आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार दिले आहेत. तसेच ११ उमेदवार अनुभवी असून, २० नव्या चेहऱ्याना संधी देण्यात आल्याची माहिती दिली.

​'सिंह' चिन्हावर लढणार..

​महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष तसेच बिगरराजकीय पदाधिकारी यांच्या सहकार्याने 'संगमनेर सेवा समिती' स्थापन झाली. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे यासाठी समितीला 'सिंह' ही निशाणी (चिन्ह) मिळाली असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले.

दरम्यान ​यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ​डॉ. सौ. मैथिलीताई तांबे यांच्यासह दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, सौ. सीमा खटाटे, भारत बोराडे, सौ. अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ. शोभा पवार, सौ. प्राची भानुदास काशीद, किशोर हिरालाल पवार, सौ. डॉ. अनुराधा निलेश सातपुते, सौ. वनिता गाडे, सौ. मालती डाके, सौ. दीपाली पांचारीया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, श्रीमती विजया गुंजाळ, शकीला बेग, नूर मोहम्मद शेख, सौ. सरोजना पगडाल, शहा नवाज खान, किशोर टोकसे, सौ. प्रियांका शहा, सौ. कविता कतारी, शैलेश कलंत्री, सौ. नंदा गरुडकर, प्रसाद पवार, मुजीब खान पठाण, नसीब मानो पठाण हे उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !