विश्वास आणि विकासाचा संगम; अमृतवाहिनीचा ११०० कोटींचा ऐतिहासिक पल्ला!
◻️ बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व नागरिकांना मदत करणारी बॅक म्हणून लौकिक
संगमनेर LIVE | कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅकेने कायम तालुक्यातील नागरिक, शेतकरी, युवक, उत्पादक यांना आर्थिक दिलासा दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या बॅकेने नुकताच व्यवसायाचा ११०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अशी माहिती बॅकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली.
जोशी म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने तीर्थरूप थोरात यांनी स्थापन केलेल्या बॅकेने कायम शेतकरी, व्यापारी, युवक यांना मदत केली आहे.
सभासद, व्यापारी, नागरिक, शेतकरी या सर्वाचा बॅकेवर मोठा विश्वास असून ६६५ कोटी रुपयांच्या ठेवी बॅकेत असून ४४६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप बॅकेने केले आहे. त्याचबरोबर कर्ज वाटपामध्ये निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांना मदत करण्याकरता भांडवली कर्जाची योजना कार्यरत केली असून त्या अंतर्गत १० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वाटप केले आहे. याचबरोबर तालुक्यातील युवकांना उद्योग व्यवसायाला मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळा अंतर्गत ही मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले आहे.
तसेच गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज, अत्यंत कमी व्याजदरामध्ये व कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करून नागरिक व अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आले आहे. बॅकेने काय ऑडिटचा अ दर्जा राखला असून नवीन अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे.
एटीएम, फोन पे, गुगल पे या सर्व डिजिटल बॅकिंग प्रणाली सुरू करण्यात आल्या असून यामुळे नागरिक व ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट पद्धतीमध्ये ही जास्त फायदा होत आहे. कामकाजातील सातत्यपूर्ण गुणवत्ता, नम्रता, तत्पर सेवा आधुनिक प्रणालींचा वापर यामुळे अमृतवाहिनी बॅकेला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले असून मागील दोन वर्षांमध्ये सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे सांगितले.
या सर्व वाटचालीमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख व अमृत उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी यांचे कायम मार्गदर्शन लाभले असून व्हा. चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती आणि सर्व कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली असल्याचे ते म्हणाले.